Pune Court On Alimony: पहिल्यापासून काडीमोड, दुसऱ्यासोबत भांडण; कोर्टाने फेटाळला विभक्त राहणाऱ्या महिलेचा पोटगीचा दावा; वाचा सविस्तर

मात्र, महिलेच्या दुसऱ्या पतीस कोर्टाने मुलाच्या संगोपणासाठी प्रतिमहिना 15,000 हजार रुपये देण्याचे आदेश दिले आहेत.

Husband Wife Relationship | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

पहिल्या पतीसोबत घटस्फोट (Divorce) झाल्यानंतर पुनर्विवाह करणाऱ्या परंतू त्या पतीपासूनही विभक्त राहणाऱ्या महिलेचा पोटगीचा (Alimony) दावा कोर्टाने फेटाळून लावला आहे. मात्र, महिलेच्या दुसऱ्या पतीस कोर्टाने मुलाच्या संगोपणासाठी प्रतिमहिना 15,000 हजार रुपये देण्याचे आदेश दिले आहेत. पुणे येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. व्ही. निमसे यांनी हे आदेश दिले. याचिकाकर्त्या महिलेने सन 2021 मध्ये पती, सासू, सासरे व नणंदेविरोधात प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात (Pune Court) कौटुंबिक हिंसाचारांतर्गत (Domestic Violence) तक्रार दाखल केली होती. तसेच, सदर महिला पतीपासून विभक्त राहात होती. दरम्यान, तिने स्वत: आणि मुलाच्या संगोपणासाठी म्हणून पोटगीची रक्कम मिळावी अशी मागणी

अर्जाद्वारे केली होती.

याचिकाकर्ती महिला आणि पती एकमेकांपासून विभक्त राहात आहेत. परंतू, दोघांपैकी कोणीही न्यायालयाकडे घटस्फोटासाठी अर्ज केला नाही. दरम्यान, महिलेने पोटगीसाठी अर्ज मात्र केला होता. या वेळी पतीची बाजू कोर्टात मांडणाऱ्या वकिलाने कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले की, सदर महिला त्याच्या आशीलाईतकी म्हणजेच पती इतकीच आर्थिक उत्पन्न मिळवते. शिवाय, तिला पहिल्या पतीपासून घटस्फोट घेतला तेव्हा 25 लाख रुपयांची नुकसानभरपाई मिळाली आहे. असे असताना आता ती पुन्हा पोटगी मागते आहे. पतीला मुलाच्या देखभालीसाठी काही रक्कम देण्यास अडचण नाही. (हेही वाचा, Married Lady Can Stay With 'Friend': विवाहीत महिलेला मित्रासोबत राहण्याची परवानगी, Corpus Plea फेटाळत कोर्टाचा पतीला धक्का)

प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. व्ही. निमसे यांनी पतीची बाजू ऐकल्यानंतर सर्व खातरजमा करुन परिस्तीतीचे पूर्ण वास्तव समजून घेतले. त्यानंतर कोर्टाची खात्री पटल्यानंतर महिलेचा पोटगीचा दावा फेटाळून लावला. मात्र, मुलाच्या देखभालीसाठी म्हणून प्रतिमहिना 15,000 रुपये देण्याचे आदेश दिले.