Rahul Gandhi यांना वीर सावरकर यांच्या अवमान प्रकरणी पुणे कोर्टाकडून समन्स; पणतू Satyaki Savarkar यांनी नोंदवला गुन्हा
राहुल गांधी यांनी मार्च 2023 मध्ये लंडनमध्ये दिलेल्या भाषणात असा दावा केला होता की विनायक सावरकर यांनी एका पुस्तकात लिहिले होते की त्यांनी आणि त्यांच्या पाच-सहा मित्रांनी एका मुस्लिम व्यक्तीला मारहाण केली होती आणि सावरकर त्यामुळे खुश होते.
पुणे कोर्टाकडून (Pune Court) कॉंग्रेस खासदार राहुल गांधी (MP Rahul Gandhi) यांना समन्स बजावण्यात आला आहे. हा समन्स विनायक दामोदर सावरकर यांच्या अवमान प्रकरणी बजावण्यात आला आहे. यामध्ये राहुल गांधींना आता 23 ऑक्टोबर दिवशी कोर्टात हजर राहण्याचे आदेश आहेत. सावरकरांचा पणतू सात्यकी सावरकर (Satyaki Savarkar) कडून हा अवमानप्रकरणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Satyaki Savarkar यांचे वकील Sangram Kolhatkar, यांनी राहूल गांधींच्या विधानावर आक्षेप नोंदवला आहे. मागील वर्षी युके मध्ये जाऊन हिंदुत्त्वावर राहुल गांधींनी विधान केले होते. त्यानंतर एप्रिल 2023 मध्ये Satyaki Savarkar यांनी पुण्यात गुन्हा नोंदवला आहे. 5 मार्च 2023 ला राहुल गांधी लंडन मध्ये बोलत असताना त्यांनी सावरकरांवर विधान केले आहे.
राहुल गांधी यांनी मार्च 2023 मध्ये लंडनमध्ये दिलेल्या भाषणात असा दावा केला होता की विनायक सावरकर यांनी एका पुस्तकात लिहिले होते की त्यांनी आणि त्यांच्या पाच-सहा मित्रांनी एका मुस्लिम व्यक्तीला मारहाण केली होती आणि सावरकर त्यामुळे खुश होते. सात्यकी सावरकर म्हणाले की, अशी कोणतीही घटना घडली नाही आणि सावरकरांनी असे कुठेही लिहिलेले नाही. त्यांनी गांधींचे आरोप "काल्पनिक, खोटे आणि दुर्भाग्यपूर्ण" असल्याचे म्हटलं आहे.
न्यायालयाने पोलिसांना या आरोपांची चौकशी करून अहवाल सादर करण्यास सांगितले होते. विश्रामबाग पोलीस ठाण्याने या प्रकरणाचा तपास केला असता तक्रारीत प्राथमिक तथ्य असल्याचे सांगितले आहे.
27 सप्टेंबर रोजी नाशिक जिल्ह्यातील न्यायालयानेही सावरकरांवरील वक्तव्याप्रकरणी राहुल गांधी यांना नोटीसही बजावली होती. हे प्रकरण नोव्हेंबर 2022 मध्ये दिलेल्या निवेदनाशी संबंधित आहे. सावरकरांच्या प्रतिमेला जाणीवपूर्वक हानी पोहोचवल्याचा दावा यामध्ये तक्रारकर्त्याने केला होता.