पुणे: उधारीच्या पैशांवरुन वाद झाल्याने तरुणाला दगडाने ठेचून मारले

पुणे (Pune) येथे एका तरुणाला उधारीवर घेतलेल्या पैशांवरुन झालेल्या वादावादीमुळे दगडाने ठेचून मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Representational Image | (Photo Credits: PTI)

पुणे (Pune) येथे एका तरुणाला उधारीवर घेतलेल्या पैशांवरुन झालेल्या वादावादीमुळे दगडाने ठेचून मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास घेतला जात असल्याचे सांगण्यात येत नाही.

कोंढवा परिसरात एका तरुणाने काही व्यक्तींकडे उधारीवर पैसे घेत होता. परंतु त्या तरुणाकडून उधारीचे पैसे परत मागितल्यास त्याचे लोकांसोबत भांडण व्हायचे. त्यामुळेच उधारीचे पैसे देण्यासाठी तरुणाचे पुन्हा एकदा भांडण झाल्याने संतापलेल्या काही व्यक्तींनी त्याच्यावर प्रथम धारधार शस्राने वार केले. त्यानंतर तरुणाच्या डोक्यात दगड घातला.

(मीरा रोड येथे आईची हत्या करत मुलानेसुद्धा संपवले आयुष्य, लॅपटॉपवर मिळाली सुसाईड नोट)

या धक्कादायक घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तसेच जखमी झालेल्या तरुणाला त्वरीत रुग्णालयात उपाचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू झाला.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement