Kalyani Nagar Pune Accident: पोर्शे कारच्या धडकेत दुचाकीचा भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू, अल्पवयीन चालकावर गुन्हा दाखल

पुणे शहरात अपघाताची मालिका सुरुच आहे. काल भरधाव कारच्या धडकेत दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेअंतर्गत पोलिसांनी अल्पवयीन कारचालकाला ताब्यात घेतले आहे. ही घटना कल्याणी नगर परिसरात घडली.

pune accident pc twitter

Kalyani Nagar Pune Accident: पुणे शहरात अपघाताची मालिका सुरुच आहे. काल भरधाव पोर्शे कारच्या धडकेत दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेअंतर्गत पोलिसांनी अल्पवयीन कारचालकाला ताब्यात घेतले आहे. ही घटना कल्याणी नगर (Kalyani Nagar) परिसरात घडली. या प्रकरणी पोलिस पुढील तपास करत आहे. दुचाकीवरून तरुण तरुणी पार्टी करून घरी जात असताना कारने धडक दिली होती. कार भरधाव वेगाने चालवत असल्याने हा अपघात घडून आला. (हेही वाचा-  चाकण-शिक्रापूर मार्गावर गॅस टँकरचा स्फोट; परिसर हादरला, घरांची पडझड (Watch Video)

मिळालेल्या माहितीनुसार, भरधाव कारने दुचाकीला धडक दिली होती. ही धडक इतकी भीषण होती की, दुचाकीवरील तरुण-तरुणी थेट उडाले. धडकेत त्यांना गंभीर दुखापत झाली आणि दोघांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर रस्त्यावर बराच वेळ वाहतुक कोंडी झाली होती. कल्याणीनगर एअर पोर्ट परिसरात कारने दोघांना धडक दिली. ब्रम्हा सनसिटीच्या मालकाचा 17 वर्षीय मुलगा हा कार चालवत होता. येरवडा पोलिसांनी या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

#Pune: Vedant Agarwal, son of Vishal Agarwal of Brahma Realty, caused a fatal accident in Kalyani Nagar at 3:00 AM on Saturday. Driving his Porsche at high speed, Vedant lost control, colliding with multiple vehicles. The crash resulted in the immediate deaths of Anis Avlia and… pic.twitter.com/Vg7yLMlzaY

तरुण तरुणी पार्टी करून घरी जात होते. दोघेही मद्यधुंद अवस्थेत होते. आरोपी निष्काळजीपणाने कार चालवत असल्याने दुचाकीला धडकली. अपघातानंतर रस्त्यावर बराच वेळ वाहतुक कोंडी झाली होती. अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिस मध्यरात्री घटनास्थळी दाखल झाले. दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. अपघातानंतर रस्त्यावरील इतर प्रवाशांनी आरोपी मुलाला मारहाण केली होती. त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. या अपघाताचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now