Pune Accident: जेजुरीला देवदर्शनाला जाताना रिक्षा विहिरीत कोसळली; नवदाम्पत्यासह तिघांचा मृत्यू

सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास हा दुर्देवी अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. सकाळी व्यायामाला आलेल्या तरुणांना विहिरीतून वाचवा, वाचवा असा आवाज आला. यावेळी त्यांनी विहिरीत पाहिले असता हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला.

पुणे जिल्ह्यात (Pune Distict) सासवड - जेजुरी (Saswad-Jejuri) पालखी महामार्गावर खळद बोरावके मळा या ठिकाणी एक भीषण अपघात (Accident) घडला आहे. पुण्यातील सासवड - जेजुरी पालखी महामार्गावर खळद बोरावके मळा येथे रिक्षा विहरीत पडल्याची घटना समोर आली आहे. अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला. पुण्यातील धायरीहून जेजुरीच्या खंडोबाच्या देवदर्शनाला निघालेली बस विहिरीत पडल्याने एका तरुणीसह नवदांपत्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. सासवड - जेजुरी पालखी महामार्गावर खळद बोरावके मळा येथे हा दुर्देवी अपघात घडला आहे.  (हेही वाचा - Jalna Accident: जालना महामार्गावर भीषण अपघात; खासगी बस पुलावरुन खाली कोसळली)

सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास हा दुर्देवी अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. सकाळी व्यायामाला आलेल्या तरुणांना विहिरीतून वाचवा, वाचवा असा आवाज आला. यावेळी त्यांनी विहिरीत पाहिले असता हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. याबाबतची माहिती तात्काळ पोलिसांना देवून रिक्षासह दोघांना सुखरुप बाहेर काढण्यात आले.

रिक्षा चालकाचे नियंत्रण सुटल्याने रिक्षा थेट विहिरीत कोसळली. या अपघातात मृतांमध्ये दोन दिवसांपूर्वी लग्न झालेल्या नवदांपत्याचाही समावेश आहे. या घटनेमुळे परिसरात शोक व्यक्त केला जात आहे.

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement