Pune Accident News: आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतण्याने दोघांना चिरडले, पुणे येथे भीषण अपघात

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुण्यातील खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील (Dilip Mohite Patil) यांच्या पुतण्याच्या कारने या दोघांना चिडल्याचे (Car Crushes )समजते. मयुर मोहिते पाटील (Mayur Mohite Patil) असे त्याचे नाव आहे.

Car Accident | (Photo credit: archived, edited, representative image)

Pune Car Accident: पुणे जिल्हा पुन्हा एकदा भीषण अपघाताने (Pune Accident) हादरला आहे. या अपघातात कारने दोघांना चिरडल्याचे वृत्त असून, एकाचा मृत्यू आणि दुसरा गंभीर जखमी झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुण्यातील खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील (Dilip Mohite Patil) यांच्या पुतण्याच्या कारने या दोघांना चिडल्याचे (Car Crushes )समजते. मयुर मोहिते पाटील (Mayur Mohite Patil) असे त्याचे नाव आहे. हा अपघात पुणे-नाशिक महामार्गावर एकलहरे नजीक शनिवारी (22 जून) रात्री घडला. अपघातामुळे परिसरातील नागरिक घटनास्थळी जमले. बराच काळ घटनास्थळवरील वातावरण तणावाचे होते. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत परिस्थिती नियंत्रणात आणली.

19 वर्षांचा तरुण हाकनाक गेला

दरम्यान, पुणे पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून शनिवारी रात्री या प्रकरणी उशीरपर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. मयुर मोहिते असे कार चालकाचे नाव आहे. जो आमदाराचा पुतण्या आहे. तर ओम भालेराव (वय-19) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो दुचाकी चालवत होता. त्याच्या दुचाकाकीला मयुर याच्या कारने धडक दिली. (हेही वाचा, Kalyan Road Accident: रिक्षाच्या धडकेत 35 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, चालकावर गुन्हा दाखल)

भीषण अपघातात दुचाकीस्वार हवेत उडाला

अपघाताबद्दल अधिक माहिती अशी की, मयुर मोहिते हा पुणे-नाशिक महामार्गावरुन पुण्याच्या दिशेने येत होता. सांगितले जात आहे की, मयुर हा विरुद्ध दिशेने आपले वाहन भरधाव वेगाने हाकत होता. त्यामुळे समोरुन आलेल्या दुचाकीस्वाराला त्याने धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, ज्यामुळे दुचाकीस्वार ओम भालेराव हा दुचाकीवरुन थेट हवेत उडाला आणि बाजूला जाऊन आपटला. त्याच्या डोके आणि छातीला गंभीर मार लागला. ज्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. यात दुसरा तरुणही गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याचे नाव समजू शकले नाही. (हेही वाचा, Pune Accident: तलाठ्याची परीक्षा देण्यासाठी जाणाऱ्या तरुणीचा टेम्पोच्या धडकेत मृत्यू; मुंबई-बेंगळुरू महामार्गावर घडली दुर्दैवी घटना)

आरोपी अपघातानंतर कारमध्येच बसून राहिला

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघात घडल्यानंतर मयुर हा कारमध्येच बसून होता. तो खाली उतरला नाही किंवा अपघातात जखमी झालेल्यांना त्याने कोणतीही मदत केली नाही. अपघाताचा आवाज ऐकून स्थानिक नागरिक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनीच या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी प्राप्त माहितीनुसार घटनास्थळ गाठले आणि मदत व बचाव कार्य सुरु केले. रात्री उशीरपर्यंत मंजर पोलीस स्टेशनमध्येय गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. दरम्यान, अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाच्या नातेवाीकांनी पोलीस स्टेशनबाहेर मोठी गर्दी केली होती. जमाव प्रचंड चिडला होता. पोलिसांनी सर्वांना शांततेचे अवाहन केले. दरम्यान, पुणे येथे अलिकडेच अत्यंत कमी कालावधीत एकापाठोपाठ एक अशा अपघाताच्या घटना घडल्या. ज्यामध्ये पोर्श कारने चिरडल्याचे आणि पिंपरी चिंचवड येथील घटनेचे पडसाद जोरदार उमटले.