महाराष्ट्रामध्ये 40% नागरिक पूरग्रस्त आणि दुष्काळग्रस्त असल्याच्या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणूक 2019 पुढे ढकलाव्यात या मागणीसाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल

त्यामुळे सुमारे 40% मतदार सध्या दुष्काळग्रस्त आणि पूरग्रस्त असल्याने आगामी विधानसभा निवडणूका पुढे ढकलाव्यात अशी मागणी करण्यात आली आहे. याकरिता मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका सादर करण्यात आली आहे.

Public Interest Litigation (Photo Credits: Twitter)

महाराष्ट्रामध्ये येत्या काही तासांमध्ये आगामी विधानसभा निवडणूक 2019 च्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर आता सारेच पक्ष तयारीला देखील लागले आहेत मात्र मागील काही महिन्यात पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण परिसरात पावसाने धूमाकुळ घातल्याने लाखो लोक बेघर झाली आहेत. सध्या महाराष्ट्राच्या काहि भागात ओला दुष्काळ आणि काही भागात सुका दुष्काळ आहे. त्यामुळे सुमारे 40% मतदार सध्या दुष्काळग्रस्त आणि पूरग्रस्त असल्याने आगामी विधानसभा निवडणूका पुढे ढकलाव्यात अशी मागणी करण्यात आली आहे. याकरिता मुंबई उच्च न्यायालयात पुण्याचे सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड. विवेक चव्हाण उर्फ भाई चव्हाण यांंनी एक याचिका सादर करण्यात आली आहे. Assembly Elections 2019: भारतीय निवडणूक आयोग महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड विधानसभा निवडणुकीची घोषणा आज करण्याची शक्यता

महाराष्ट्रामध्ये सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली सरकार चालवले जात आहे. ही महाराष्ट्रातील 13 वी विधानसभा आहे. येत्या 9 नोव्हेंबरला या विधानसभेचा कार्यकाळ संपणार आहे. त्यानंतर नवी विधानसभा स्थापन करण्यासाठी लवकरच महाराष्ट्र विधानसभा 2019 निवडणूका जाहीर करण्यात येणार आहेत. Maharashtra Flood 2019: महाराष्ट्र पूर परिस्थिती पाहता विधानसभा निवडणूक पुढे ढकला, राज ठाकरे यांची मागणी

ANI Tweet  

महाराष्ट्रात मागील महिन्यात पश्चिम महाराष्ट्रात सातारा, सांगली, कोल्हापूर या भागामध्ये मुसळधार पाऊस पडला. पुराच्या वेढ्यात अडकलेल्या लाखो लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. शेती, रस्ते, घरं यांचं प्रचंड नुकसान झाल्याने लाखो लोकं बेघर झाली आहेत. तर मराठवाड्यात अनेक लोकं दुष्काळाचा सामना करत आहेत. या पार्श्वभूमीवर आता राज्यातील विधानसभा निवडणूका पुढे ढकलण्याचा निर्णय घ्यावा अशी मागणी पुढे आली आहे. यापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील राज्यातील विधानसभानिवडणूका पुढे ढकलाव्यात अशी मागणी केली होती.