धक्कादायक! धावत्या खासगी ट्रॅव्हल्समध्ये बस क्लिनरकडून 21 वर्षीय तरुणीवर बलात्कार, वाशिममधील घटना

धावत्या ट्रॅव्हल्समध्ये या आरोपीने तरुणीवर बलात्कार करुन याची कुठे वाच्यता केल्यास चालत्या गाडीतून तिला फेकून देण्याची धमकी दिली. आरोपी फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहे.

धक्कादायक! धावत्या खासगी ट्रॅव्हल्समध्ये बस क्लिनरकडून 21 वर्षीय तरुणीवर बलात्कार, वाशिममधील घटना
Representational Image (Photo Credits: ANI)

महिलांवरील होणारे अत्याचार दिवसेंदिवस गंभीर रुप धारण करत आहेत. याला लगाम घालण्यासाठी काही कठोर कायदे तात्काळ अंमलात आणण्याची गरज आहे. ABP माझाने दिलेल्या वृत्तानुसार, वाशिममार्गे (Washim) पुण्याला जाणा-या एका खासगी ट्रॅव्हल्समध्ये (Private Travels) बसच्या क्लिनरने 21 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. धावत्या ट्रॅव्हल्समध्ये या आरोपीने तरुणीवर बलात्कार करुन याची कुठे वाच्यता केल्यास चालत्या गाडीतून तिला फेकून देण्याची धमकी दिली. आरोपी फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरहून वाशिममार्गे पुण्याला जाणा-या एका खासगी बसमध्ये हा प्रकार घडला. पीडित तरुणी ही गोंदियाची असून ती या बसमधून पुण्याला जात होती. मात्र वाशीमच्या कारंजा दरम्यान गाडीच्या क्लिनरने त्या पीडित तरुणीला तुमची सीट ही नसल्याचं सांगून मागच्या सीटवर बसवलं. त्यानंतर तरुणीला चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देऊन विनयभंग करून तिच्यावर बलात्कार केला. तसच या घटनेची वाच्यता केल्यास चालत्या गाडीतून फेकून देण्याची धमकीही दिली.हेदेखील वाचा- Pune: पुण्यात डेटिंग अ‍ॅपवर ओळख झालेल्या तरुणाकडून महिलेवर वारंवार बलात्कार; गुन्हा दाखल

याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी ही घटना ज्या बसमध्ये घडली ती ट्रॅव्हल्स जप्त केली आहे. समीर देवकर असे आरोपीचे नाव असून तो फरार आहे. त्याचा शोध सुरु असल्याचं पोलिसांनी सांगितले.

दरम्यान वाराणसीहून औरंगाबादमध्ये आलेल्या एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार (Gang Rape) करण्यात आला आहे. रविवारी रात्री औरंगाबाद रेल्वे स्थानक परिसरात ही घटना घडली. पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार, या प्रकरणी उस्मानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.

(The above story first appeared on LatestLY on Jan 11, 2021 05:33 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).