Mann Ki Baat: महाराष्ट्र कोविड टास्क फोर्स सदस्य डॉ. शशांक जोशी यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘मन की बात’

या कार्यक्रमात महाराष्ट्र कोविड टास्क फोर्स (Maharashtra Covid Task Force) सदस्य डॉ. शशांक जोशी यांचाही समावेश होता. डॉ. शशांक जाशी (Dr. Shashank Joshi) यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात' कार्यक्रमात संवाद साधला.

Mann Ki Baat | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज (25 एप्रिल) 'मन की बात' (Mann Ki Baat) या कार्यक्रमात देशातील विविध घटकांशी संवाद साधला. यात कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटात रुग्णांची सेवा आणि उपचार करणारे डॉक्टर, नर्स, रुग्णवाहीका चालक, कोरोनातून बरे झालेले नागरिक यांसह इतरांचाही समावेश होता. आजच्या 'मन की बात' कार्यक्रमात प्रामुख्याने कोरोनाशी लढा देणारे पहिल्या फळीतील योध्ये (फ्रंटलाईन वर्कर) होते. या कार्यक्रमात महाराष्ट्र कोविड टास्क फोर्स (Maharashtra Covid Task Force) सदस्य डॉ. शशांक जोशी यांचाही समावेश होता. डॉ. शशांक जाशी (Dr. Shashank Joshi) यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात' कार्यक्रमात संवाद साधला.

डॉ. शशांक जोशी यांच्याशी बोलताना पंतप्रधानांनी त्यांचे कौतुक केले. पंतप्रधान म्हणाले 'डॉ. शशांक जोशी, आपण जे विचार स्पष्ट केले. या विचरांतील स्पष्टता मला आवडली. आपण सध्या दिनरात काम करता आहात. लोकांना आपण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेबद्दल सांगायला हवे.' या वेळी पंतप्रधान मोदी यांनी डॉ. शशांक जोशी यांना कोरोनाची दुसरी लाट ही पहिल्या लाटेपेक्षा कशी वेगळी आहे. तसेच या लाटेत आपण काय काळजी घ्यायला हवी? याबाबत विचारले. (हेही वाचा, Covid-19 Second Wave in India: कोरोनाविरुद्धच्या दुसऱ्या लाटेत भारताला जगभरातून मदतीसाठी पाठिंबा; पाकिस्तान ते अमेरिका अनेक देश आले पुढे)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रश्नाला उत्तर देताना डॉ, शशांक जोशी म्हणाले, पहिल्या लाटेपेक्षा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोविड विषाणू प्रसाराचा वेग अधिक आहे. त्यामुळे कोरोनाची दुसरी लाट ही पहिल्या लाटेपेक्षा अधिक वेगवान असल्याचे दिसते. पण, यात महत्त्वाची बाब अशी की कोरोनाची दुसरी लाट वेगवाण असली तरीही या लाटेतही कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट चांगला आहे. पण, चिंतेची बाब अशी की या वेळी मागच्या वेळच्या तुलनेत तरुण आणि लहान मुलांमध्येही कोरोनाचे संक्रमण मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहे. कोरोनामुळे लोक घाबरल्याचे पाहायला मिळते आहे. घाबरून जाण्याचे कारण नाही 80% लोकांना लक्षणंच दिसत नाही. केवळ म्युटेशनमुळे घाबरुन जाण्याची गरज नसल्याचेही डॉ. शशांक जोशी यांनी 'मन की बात' कार्यक्रमात पंतप्रधानांना सांगितले.

दरम्यान, पंतप्रधानांनी विचारले की, कोरोना उपचारासांबाबत आणि काही औषधांच्या मागणीबाबत तुम्ही लोकांना काय माहिती द्याल. यावर डॉ. शशांक यांनी सांगितले की, अनेक लोक उगाचच घाबरुन जातात. जर काही त्रास जाणवत असेल तर दुखणं अंगावर काढतात. रुग्णालयात उपचार घेणे टाळतात. तसेच, मोबाईलवर प्राप्त झालेल्या माहितीवर विश्वास ठेवतात. त्यामुळे असे रुग्ण जेव्हा रुग्णालयात उपचारासाठी येतात तेव्हा बराच वेळ गेलेला असतो. दुसरे असे की, देशात सध्या रेमडेसीवर औषधांची चर्चा आहे. पण ही औषधे घेतल्याने केवळ रुग्णालयातून दोन-तीन दिवस लवकर सुट्टी मिळू शकते. यापलीकडे त्याचा फार फायदा होत नाही. कोरना हा तीन प्रकारचा आढळतो. हलका, मध्यम आणि तीव्र करोना. हलका कोरोना असणाऱ्यांना साधारण ताप येतो, शरीरातील ऑक्सिजनची पातळी काहीशी खालावते. अशा वेळी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. मध्यम आणि तीव्र कोरोना असणाऱ्या रुग्णांनी मात्र प्रथम डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. तसेच अधिक काळजी घेण्याचीही आवश्यकता आहे. कोरोनाची औषधं अत्यंत स्वस्त दरात मिळतात. उगाचच महागड्या औषधांमागे धावण्यात काहीही अर्थ नाही. उगाचच लोकांच्या मनात भ्रम निर्माण झाल्याचही डॉ. शशांक म्हणाले.