Pimpri Murder: खळबळजनक! आधी धारदार शस्त्र भोकसून केली हत्या; मग पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेहच टाकला जाळून
ही धक्कादायक घटना पुणे (Pune) जिल्ह्यातील पिंपरी (Pimpri) परिसरात घडली आहे. या घटनेनंतर आजूबाजुच्या परिसरात चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहेत.
एका व्यक्तीची हत्या (Murder) केल्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेहच जाळून टाकल्याची माहिती उघडकीस आली आहे. ही धक्कादायक घटना पुणे (Pune) जिल्ह्यातील पिंपरी (Pimpri) परिसरात घडली आहे. या घटनेनंतर आजूबाजुच्या परिसरात चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहेत. मृताच्या खिशात असलेल्या मोबाईल क्रमांकावरून हिंजवडी पोलिसांना (Hinjewadi Police) मृताची ओळख पटली. त्यानंतर पोलिसांनी मृताच्या नातेवाईकांना याबाबत माहिती दिली. तसेच या हत्येमागचे नेमके काय हे अद्याप अस्पष्ट असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
संदीप पुंडलिक माईनकर (वय, 53) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. संदीप हे कोणताही कामधंदा करत नव्हते. ते इकडे तिकडे भटकून भाजी मंडई किंवा इतर ठिकाणी झोपायचे, अशी माहिती त्यांचा मुलगा आशिष माईनकर याने दिली आहे. दरम्यान, एका अज्ञात व्यक्तिने त्यांची धारदार शस्त्राने माईनकर यांची हत्या केली. त्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपीने त्यांचा मृतदेह जाळून टाकला. ही घटना २९ नोव्हेंबरला सकाळी अकरा वाजता उघड झाली. याघटनेने आजूबाजुच्या परिसरात एकच खळबळ माजली होती. हे देखील वाचा- नाशिक: गेम खेळायला मोबाईल न दिल्याच्या रागातून गावातील शेतकऱ्याची हत्या; 19 वर्षीय युवक अटकेत
हिंजवडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेंगळरू- मुंबई महामार्गाजवळ मृतदेह आढळून आला. त्यावेळी मृताच्या खिशात असलेल्या क्रमांकावरून मृताची ओळख पटली. मात्र, या हत्येमागचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस याबाबत अधिक चौकशी करत आहेत. पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. यामुळे पुणे देखील बिहारच्या दिशेने वाटचाल करतोय की काय? अशी भिती अनेकांच्या मनात येऊ लागली आहे.