On Duty Election Officer Death in Mumbai: 'प्रिसायडिंग ऑफिसर'चा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, परळ भोईवाडा येथील घटना

लोकसभा निवडणुका 2024 च्या पाचव्या टप्प्यातील मतदान सुरू असताना मुंबईतील वडाळा येथील मतदान केंद्रावर एका प्रिसायाडींग ऑफिसरचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

Representational Image (File Photo)

On Duty Election Officer Death in Mumbai: लोकसभा निवडणुका 2024 च्या पाचव्या टप्प्यातील मतदान सुरू असताना मुंबईतील वडाळा येथील विधानसभा मतदान संघातील एका प्रिसायाडींग ऑफिसरचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.  20 मे रोजी मुंबईत ठिकठिकाणी मतदान सुरु होते. त्यासाठी पूर्व तयारी करत असताना 19 मे रोजी प्रिसायडींग ऑफिसर आणि पोलिस यंत्रणा सज्ज झाली होती. रविवारी प्रिसायडींग ऑफिसर काम करत असाताना अचानक छाती त्यांच्या दुखण सुरु झालं होत. काही वेळातच त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला अशी माहिती माध्यमांना मिळाली आहे. (हेही वाचा- उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याचा मतदान केंद्रात मृत्यू, मुंबई येथील घटना)

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील 30 मुंबई दक्षिण -मध्य लोकसभा मतदान केंद्रात 180 वडाळा येथील मतदार संघ झोन 20 मधील बुथ क्रमांक 189 सेंट पॉल मुलांची शाळेत काम करत असताना 'प्रिसायडिंग ऑफिसरचा' मृत्यू झाला. सुनील लक्ष्मण गवळी (वय वर्ष 56) असं या प्रिसायडिंग ऑफिसरचे नाव आहे. मतदान केंद्रावर पूर्व तयारी करत असताना, त्यांच्या छातीत दुखलं. त्यानंतर ते बेशुध्द अवस्थेत जमिनीवर पडले. इतर पोलिसांच्या मदतीने त्यांना केईएम रुग्णलयात दाखल करण्यात आले होते. परंतु उपचारादरम्यान त्यांनी रुग्णालयात शेवटाचा श्वास घेतला. या घटनेची माहिती डॉक्टरांनी पोलिसांना दिली.

दरम्यान, काल उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटातील मतदान केंद्र प्रतिनिधी यांचा शौचालयात मृतदेह आढळून आला होता. नोहर नलगे असं प्रतिनिधीचे नाव होते. मृतदेह आढळून आल्याने केंद्रावर एकच खळबळ उडाली होती.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif