Monsoon 2019: औरंगाबाद, अहमदनगर मध्ये वादळी वार्‍यासह पाऊस, नाशिक मध्ये 70 वर्षीय महिलेचा मृत्यू

नाशिकमध्ये मान्सून पूर्व पावसासह वीजांचा कडकडाट आणि वादळी वार्‍यांमुळे झाडांची पडझड झाली आहे.

Pre Monsoon Rain In Maharashtra (Photo Credits: ANI)

केरळमध्ये मान्सूनचं दमदार आगमन झाल्यानंतर आता मुंबईसह महाराष्ट्रामध्येही पुढील आठ्वड्याभरात मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे. दरम्यान आज (9 जून) मान्सूनपूर्व सरींमुळे अहमदनगर,औरंगाबाद, नाशिकसह महाराष्ट्रातील काही भागांना झोडपून काढलं आहे. सुखवार्ता! अखेर मान्सून केरळात दाखल; लवकरच महाराष्ट्रातही धडकणार

औरंगाबाद मध्ये तसेच अहमदनगरमधील संगमनेर, कर्जत भागांसह अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व सरी बरसल्या आहेत. नाशिकमध्ये मान्सून पूर्व पावसासह वीजांचा कडकडाट आणि वादळी वार्‍यांमुळे झाडांची पडझड झाली आहे. यामध्ये एका 70 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे.तर त्यांच्या कुटुंबातील 3 अन्य व्यक्ती जखमी आहेत.

ANI Tweet: 

सध्या महाराष्ट्रात अनेक ठिकाणी प्रचंड उकाड्याने नागरिक त्रस्त आहेत.