Chandrakant Patil On Pravin Darekar: प्रवीण दरेकर यांच्या मनात अश्लील अर्थ नव्हता; 'मुका' विधानावर चंद्रकांत पाटील यांच्याकडून पाठराखण
लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत आहेत. या मुद्द्यावरुन बोलताना प्रविण दरेकर यांनी 'रंग लावलेल्या गालाचे मुखे घेणारा पक्ष' अशी राष्ट्रवादी काँग्रेसची संभावना केली.
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी केलेल्या विधानावरुन भाजपची (BJP) चांगलीच गोची झाली आहे. असे असले तरी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Pravin Darekar) यांनी मात्र प्रविण दरेकर यांची पाठराखण केली आहे. प्रविण दरेकर यांनी विधान केले असली तरी त्यांच्या मनात अश्लिल अर्थ नव्हता असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी क्लिन चिटही देऊन टाकली आहे. लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत आहेत. त्यांनी तसे जाहीरही केले आहे. दरम्यान, या मुद्द्यावरुन बोलताना प्रविण दरेकर यांनी 'रंग लावलेल्या गालाचे मुखे घेणारा पक्ष' अशी राष्ट्रवादी काँग्रेसची संभावना केली.
प्रविण दरेकर नेमके काय म्हणाले?
''राष्ट्रवादी काँग्रेसला गरीब लोकांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळ नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा ‘रंगलेल्या गालाचा’ मुका घेणारा पक्ष आहे''.
चंद्रकांत पाटील नेमके काय म्हणाले?
“प्रविण दरेकर जे वाक्य बोलले ते बोलीभाषेत वापरलं जातं. त्याचा एवढा इश्यू करण्याची गरज नाहीय. आपण दररोजच्या बोलण्यात वाक्यप्रचार वापरत असतो. त्यामुळे उगीच पराचा कावळा करु नये. त्याचा अर्थ वेडावाकडा घेऊ नये. प्रवीण दरेकरांच्या मनात अश्लील अर्थ नव्हता”. (हेही वाचा, Raosaheb Danve on Congress: काँग्रेसच्या माडीला शरद पवार यांचा टेकू, रावसाहेब दानवे यांचा बाळासाहेब थोरात यांना टोला)
ट्विट
प्रविण दरेकर यांच्या वक्तव्याने राष्ट्रवादीच्या गोटात तीव्र पडसाद उमटले. अनेकांनी प्रविण दरेकर यांच्यावर टीका केली. काहींनी दरेकर यांनी माफी मागून विधान मागे घ्यावे, अशीही मागणी केली. भाजपने मात्र दरेकर यांच्या विधानाबाबत दरेकर यांचे समर्थन करत त्यांना क्लिनचिटच दिली आहे. दरेकर यांच्या विधानावरुन बोलताना राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी प्रविण दरेकर यांनी माफी मागावी असे म्हटले आहे. तसेच, चाकणकर यांनी गाल रंगविण्याचीही भाषा केली आहे.