Pravara River SDRF Boat Accident: प्रवरा नदीत बुडालेल्या तरूणाचा शोध घेण्यासाठी आलेली SDRF ची बोट उलटली; 3 जवानांचा मृत्यू

SDRF पथकातील चार जणांसह एक स्थानिक बोटीत बुडाला. दोघांचा शोध घेण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

Pravara River SDRF Boat Accident: प्रवरा नदीत बुडालेल्या  तरूणाचा शोध घेण्यासाठी आलेली SDRF ची बोट उलटली; 3 जवानांचा मृत्यू
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

अहमदनगर मधील अकोले इथे प्रवरा नदी (Pravara River) मध्ये SDRFची बोट उलटून बचावकार्यात आलेल्या 3 जवानांचा मृत्यू झाला आहे. प्रवरा नदीत काल काही तरूण बुडाल्याची माहिती मिळाली होती त्यांच्या शोध आणि बचावकार्यासाठी एसडीआरएफची बोट आली मात्र ती देखील उलटली आणि त्यामध्ये 3 जवानांचा मृत्यू झाला आहे. प्रकाश शिंदे, वैभव वाघ, राहुल पवार अशी मृत जवानांची नावे आहेत.

उकाड्याने त्रस्त अनेकजण नदी मध्ये पोहण्याचा आनंद घेण्यासाठी उतरले होते. त्यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने 25 वर्षीय पोपट जेडगुले आणि 18 वर्षीय अर्जुन जेडगुले यांचा बुडून मृत्यू झाला. त्यापैकी एकाचा मृतदेह सापडला होता मात्र दुसर्‍या तरूणाच्या शोधासाठी आलेले SDRF जवान देखील मृत्यूमुखी पडले आहेत. त्यांची बोट बुडाल्याने मृत्यू झाला. पथकातील चार जणांसह एक स्थानिक बोटीत बुडाला. दोघांचा शोध घेण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. अकोले तालुक्यातील सुगाव गावा जवळची ही घटना आहे. घटनास्थळी माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात पोहोचले  असून दोघांचा शोध सुरू असल्याची माहिती  प्रांताधिकारी शैलेश कुमार हिंगे यांनी दिली आहे.

 प्रवरा नदीत दुर्घटना

उजनी धरणातील बोट दुर्घटना ताजी असताना आता अकोलेमधील अहमदनगर-प्रवरा नदीत एसडीआरफची बोट उलटल्याचा हा एक अजून एक अपघात समोर आला आहे.  उजनी जलाशयामध्ये बोट पलटी होऊन सहा जण बुडाले आहेत.  त्यातील पाच जणांचे मृतदेह सापडले आहेत. एकाचा शोध सुरू आहे.

(The above story first appeared on LatestLY on May 23, 2024 02:54 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).