प्रताप सरनाईक यांना 23 ऑगस्ट पर्यंत दिलासा; बॉम्बे हाय कोर्टाकडून ईडीला तूर्तास कठोर कारवाई न करण्याचे आदेश

दरम्यान दोन्ही प्रकरणांची एकत्र सुनावणी घेण्याची याचिका कर्त्यांची मागणी देखील कोर्टाने मान्य केली आहे.

Pratap Sarnaik | (Photo Credits: Facebook)

ईडीच्या (ED) रडार वर असलेल्या आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांना सध्या तात्पुरता दिलासा देण्यात आला आहे. तूर्तास कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने ईडी ला दिले आहेत त्यामुळे येत्या 23 ऑगस्ट पर्यंत आमदार प्रताप सरनाईक आणि त्यांच्या कुटुंबाला दिलासा मिळाला आहे. आज सकाळी कोर्टामध्ये प्रताप सरनाईक यांच्या प्रकरणावर सुनावणी अपेक्षित होती पण आज दिवसभर परमबीर सिंग व रश्मी शुक्ला यांच्या याचिकांवर सुनावणी होणार असल्याने ही सुनावणी महिनाभरासाठी तहकूब करण्यात आली आहे. त्यामुळे प्रताप सरनाईकांच्या प्रकरणावर 23 ऑगस्टला पुढील सुनावणी होणार आहे.

एनएसईएल आणि टॉप्स सिक्युरिटी प्रकरणामध्ये ईडीच्या कारवाई विरोधात प्रताप सरनाईक यांच्यासोबत त्यांचे दोन्ही लेक कोर्टात गेले आहेत. दरम्यान दोन्ही प्रकरणांची एकत्र सुनावणी घेण्याची याचिका कर्त्यांची मागणी देखील कोर्टाने मान्य केली आहे. सध्या मनी लॉडरिंग प्रकरणामुळे प्रताप सरनाईकांसमोर अडचणी वाढल्या आहेत.

प्रताप सरनाईक यांच्या विहंग़ गृहनिर्माण कंपनीने एका प्रोजेक्टसाठी टिटवाळा मध्ये जमिन खरेदी केली होती. 22 हजार कोटी रूपयांच्या या व्यवहारात फसवणूक झाल्याचा आरोप आहे. तर टॉप्स सिक्युरिटीज मध्ये देखील गैरव्यवहार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.