Congress: प्रशांत किशोर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश जवळपास निश्चित, सूत्रांची माहिती
सूत्रांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार पाठीमागच्या काही दिवसांमध्ये प्रशांत किशोर आणि गांधी कुटुंबीयांमध्ये एक बैठक पार पडली होती.
राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांचे कांग्रेस (Congress) पक्षात प्रवेश करणे जवळपास निश्चित झाले आहे. सूत्रांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार पाठीमागच्या काही दिवसांमध्ये प्रशांत किशोर आणि गांधी कुटुंबीयांमध्ये एक बैठक पार पडली. या बैठकीत प्रशांत किशोर यांनी 2024 च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन काँग्रेससमोर एक प्रजेंटेशनही सादर केले. यावरुन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी एक समितीही बनवली होती. या समितीने एक अहवालही सादर केला आहे.
सांगितले जात आहे की, प्रशांत किशोर यांचा पक्षात प्रवेश करण्याबद्दल अद्यापही एकवाक्यता नाही. काही नेत्यांनी त्यांना पक्षात आल्यावर राजकीय रणनितीसोबतच इतरही काही जबाबदारी द्यावी असे म्हटले आहे. तर काहींनी त्यांना केवळ राजकीय रणनितीवरच लक्ष्य केंद्रीत करावे असे म्हटले आहे. प्रशांत किशोर हे केवळ सोनिया गांधी किंवा पक्षाचा जो कोणी अध्यक्ष असेल त्यांनाच जबाबदार राहून रिपोर्ट करु इच्छितात. त्यांना वाटते की ते आपले म्हणने स्पष्ट अध्यक्षांजवळ व्यक्त करु शकतात असा त्यांना पक्षाने अधिकार द्यावा. (हेही वाचा, Gujarat Assembly Election 2022: राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांचा राहुल गांधी यांना संपर्क, गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दिशेने पाऊल, सूत्रांची माहिती)
सूत्रांच्या माहितीनुसार त्यांची पक्षातील जबाबदारी ही काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्याशी विचारविनीमय केल्यानंतरच निश्चित केली जाईल. दरम्यान, यात एक अट आहे की, प्रशांत किशोर यांच्या भूमिकेवरुन जी एक समिती बनवली होती, त्या समितीचे म्हणने असे की, किशोर यांनी त्यांना काँग्रेससोबत काम करताना इतर पक्षांकडून स्वत:ला दूर करायला हवे. तसेच, पूर्णवेळ केवळ काँग्रेससोबतच काम करावे लागेल.
प्रशांत किशोर यांनी यापूर्वी अनेक राजकीय पक्षांसोबत काम केले आहे. यात तृणमूल काँग्रेस, जगमोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेस, काही प्रमाणात शिवसेना अशा पक्षांसोबत काम केले आहे.