Police Constable Murder: क्रिकेट खेळण्यावरून वाद जीवाशी बेतला, मुंबई पोलिस हवालदाराची हत्या, चाळीसगावातील घटना
महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात क्रिकेट खेळण्यावरून वाद झाला आणि एका पोलिस हवालदाराची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.
Police Constable Murder: महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात क्रिकेट खेळण्यावरून वाद झाला आणि एका पोलिस हवालदाराची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. क्रिकेट सामन्यावरून झालेल्या बाचाबाचीच 12 जणांच्या टोळक्यांनी पोलिसांवर हल्ला केला. या जीव घेण्या हल्ल्यात पोलिस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू झाला. मारेकरू टोळक्यांनी तलवार आणि क्रिकेट स्टंपने पोलिसावर हल्ला केला. ही घटना जळगावातील चाळीसगाव येथील आहे. रविवारी दुपारी ही घटना उघडकीस आली. (हेही वाचा- पालघर येथील आश्रम शाळेतील खळबळजनक घटना; दोन लाडू का घेतले म्हणून शिक्षकाकडून विद्यार्थ्याला बेदम मारहाण)
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव येथील चाळीसगाव येथे एका तरुण पोलिस हवालदाराची हत्या केली. या घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली आहे. शुभम आगोने (वय २८) असं हवालदाराचे नाव होते. तो मुंबई येथील मरोळ ल विभाग ४ येथे कार्यरत होता. शुभम गावी होता. दरम्यान गावातील तो एका क्रिकेट सामन्यात खेळत होता. खेळता खेळता शुभमचे प्रतिस्पर्धी यांच्यासोबत शाब्दिक भांडण झालं. भाडंणानंतर प्रतिस्पर्धींनी टोकाचे पाऊल उचलत शुभमवर हल्ला केला. हल्लेखोरांनी तलवार आणि क्रिकेटच्या स्टंपने हल्ला केला. या हल्ल्यात शुभम गंभीर जखमी झाला. तो रक्त बंबाळ अवस्थेत जमिनीवर पडून राहिला.
त्याच्या मित्राने शुभमला तात्काळ जिल्हा रुग्णालायत दाखल करण्यात आले. रुग्णालयात उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर शुभम यांचा भाऊ आनंद आगोने यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, चाळीसगाव येथील पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवला गेला. १२ जणांविरुध्दात गुन्हा दाखल करण्यात आला. आतापर्यंत तीन हल्लेखोरांना अटक करण्यात आली. त्यांना रविवारपर्यंत सात दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे.या घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली.