Ratnagiri Sex Racket: कोकणात हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफास, पोलीसांकडून फार्म हाऊसवर छापा

पोलिसांनी सापळा रचून छापा टाकला असता भयंकर घटना घडकीस आली आहे. कोकणातील घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

Ratnagiri Sex Racket: कोकणात हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफास, पोलीसांकडून फार्म हाऊसवर छापा
sex racket pc File image

Ratnagiri Sex Racket: कोकणातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोकणात हाय प्रोफाई सेक्स रॅकेट चालू असल्याची माहिती समोर आली आहे. रत्नागिरी पोलिसांना माहिती मिळताच सेक्स रेकेटचा पर्दाफास केला आहे. पोलिसांनी सापळा रचून ही घटना समोर आणली. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालूक्यात या घटनेतून सहा जणांना अटक करण्यात आले आहे. चिंचवड परिसरातील दवाबिंदू फार्म हाऊसवरती असाच सेक्स रॅकेटचा प्रकार समोर आला आहे.

कोकणात या घटनेमुळे मोळी खळबळ उडाली आहे. पोलीसांनी आरोपींवर अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६”अन्वये ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. काही दिवसांपासून रत्नागिरीत सेक्स रॅकेटच व्यवसाय सुरु असल्याची धक्कादायक माहिती पोलिसांनी दिली आहे. खेड येथील वेताळवाडी येथील दवबिंदू फार्म हाऊस सेक्स रॅकेट प्रकरणात रविंद्र गणपत गावडे एक महिला आरोपी या दोघांवरतीही शनिवारी दुपारी उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेमुळे परिसरात भीतिचे वातावरण निर्माण झाले आहे, पोलीसांना ही माहिती मिळताच सापळ रचत फार्म हाउस वर छापा टाकला. छापा टाकताच त्यांनी आरोपींना ताब्यात घेतले. पोलिसांनी या रेकेट मधून काही तरुणींची सुटका केली आहे. वेश्या व्यवसायात अडकलेल्या तरुणींना पोलीसांनी सुधारगृहात पाठवण्यात आले आहे. आरोपींवर मोठ्यात मोठी कारवाई केली जाणार अशी माहिती पोलीसांनी दिली आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jul 31, 2023 10:41 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).