पोहरादेवी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष महंत कबीरदास यांच्यासह 19 जणांना कोविड-19 ची लागण
वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी मंदिर आणि सेवालाल ट्रस्टचे अध्यक्ष कबीरदास महंत यांच्यासह तीन जणांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे. यामुळे कोरोना संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.
वाशिम (Washim) जिल्ह्यातील पोहरादेवी मंदिर (Pohradevi Mandir) आणि सेवालाल ट्रस्टचे अध्यक्ष महंत कबीरदास यांच्यासह 19 जणांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे. यामुळे कोरोना संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. दोन दिवसांपूर्वीच पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाशी (Pooja Chavan Suicide Case) संबंधित नॉट रिचेबल असलेले वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्या समर्थनासाठी 10 हजार लोक या ठिकाणी जमले होते.
महंत कबिरदास महाराजांनी 21 फेब्रुवारी रोजी कोरोनाची चाचणी केली होती. तिचा अहवाल पॉझिटीव्ह आला असून त्यांच्या कुटुंबातील तिघांनाही कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, पोहरादेवी येथे दर्शनासाठी आलेले वनमंत्री संजय राठोड त्यांच्या संपर्कात आले होते.
राज्यातील कोरोना बाधितांच्या वाढत्या संख्येमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धार्मिक कार्यक्रम, राजकीय सभा, मोर्चांवर बंदी घातली आहे. त्यामुळे अनेक नेत्यांनी आपले राजकीय दौरे रद्द केले. मात्र नियमांचे उल्लंघन करत संजय राठोड यांनी पोहरादेवी येथे जोरदार शक्तीप्रदर्शन केले. त्यांच्या स्वागतासाठी तब्बल 10 हजार लोक जमले होते. मात्र पोहरादेवी मंदिराचे अध्यक्ष महंत कबीरदास इतर 19 जण कोरोना पॉझिटीव्ह आढल्याने आता कोरोनाचा धोका निश्चितच वाढला आहे. (Sanjay Rathod: वनमंत्री संजय राठोड यांच्या समर्थनार्थ पोहरादेवी येथे जमलेल्या 10 हजार जणांवर गुन्हा दाखल)
दरम्यान, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी भाजप आक्रमक झाली असून संजय राठोड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे. आज त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली असून स्थानिक पोलिस स्टेशनलाही भेट दिली आहे. तसंच हा मुद्दा लावून धरणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
(The above story first appeared on LatestLY on Feb 25, 2021 12:26 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

