PMPML Ladies Special Bus: पुण्यात 28 नोव्हेंबर पासून 19 मार्गांवर धावणार महिला विशेष बस; वाहकही महिला
मात्र अशा परिस्थितीमध्येही गर्दीच्या वेळेस महिलांना त्रास होतो. विविध अडचणींना सामोरं जावं लागत आहे.
पुण्यात (Pune) आता महिला प्रवाशांसाठी बसची खास सुविधा 28 नोव्हेंबर पासून सुरू होत आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाने (PMPML) पुणे व पिंपरी-चिंचवडमधील (Pimpri Chinchwad) 19 मार्गांवर 24 महिला विशेष बस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळेस या विशेष बस चालवल्या जाणार आहेत. त्यामुळे महिला प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. पुण्यात वाहतूक कोंडीची मोठी समस्या आहे.
दरम्यान पुण्याच्या पीएमपी बस मध्ये 50% आसनव्यवस्था ही महिलांसाठी राखीव आहे. मात्र अशा परिस्थितीमध्येही गर्दीच्या वेळेस महिलांना त्रास होतो. विविध अडचणींना सामोरं जावं लागत आहे. त्यामुळे काही संघटनांकडूनच महिला विशेष बसची मागणी करण्यात आली होती. महिला विशेष बस आता 19 मार्गांवर चालवल्या जाणार आहेत. यामध्ये वाहकही महिला असणार आहे. नक्की वाचा: Pune PMPML: 'पीएमपीएल'च्या निर्णयाचा पुणेकरांना फटका! पुण्यातील 11 मार्गावरील पीएमपीएमएलची सेवा उद्यापासून बंद .
कोणकोणत्या मार्गांवर महिला विशेष बस?
पुण्यामध्ये स्वारगेट ते अप्पर डेपो, स्वारगेट ते हडपसर, स्वारगेट ते येवलेवाडी, अप्पा बळवंत चौक ते सांगवी, कोथरूड ते विश्रांतवाडी, मनपा भवन ते लोहगाव, अप्पर डेपो ते पुणे स्टेशन, कात्रज ते महाराष्ट्र हौसिंग बोर्ड, कात्रज ते कोथरूड डेपो, हडपसर ते वारजे माळवाडी, भेकराईनगर ते मनपा भवन, हडपसर ते वाघोली, पुणे स्टेशन ते लोहगाव, मनपा भवन ते आकुर्डी रेल्वे स्टेशन, निगडी ते पुणे स्टेशन (औंध मार्गे), निगडी ते भोसरी, निगडी ते हिंजवडी माण, चिंचवडगाव ते भोसरी, चिखली ते डांगे चौक या मार्गांवर महिला विशेष बस चालवली जाणार आहे.