IPL Auction 2025 Live

PMPML Bus Hijacked: पुणे येथे धक्कादायक प्रकार, चोरट्याने पळवली पीएमपीएमएल बस; बॅटरी चोरुन पोबारा

जाताना त्याने बसची बॅटरी काढून नेली. चोरट्याने बसच्या काचाही फोडल्या आणि बसचे नुकसान केले. बस चोरीला गेल्याचे लक्षात आल्यावर प्रशासनाने 14 जून रोजी बसचा शोध घेतला असता ती मार्केट यार्ड आगाराजवळ लावल्याचे पाहायला मिळाले.

PMPML Bus | (File Image)

PMPML Bus Stolen: पुणे शहरातून एक धक्कादायक प्रकार पुढे येत आहे. एका चोरट्याने चक्क पीएमपीएमएल (PMPML) बसच चोरल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्राप्त माहितीनुसार, या चोरट्याने पुणे येथील सण मैदान परिसरातून बस चोरली. त्याला पुढच्या काहीच वेळात आपण काहीतरी भलतेच करतो आहोत. हे बहुदा त्याच्या लक्षात आले. मग त्याने ही बस पुणे मार्केट यार्ड परिसरात सोडली. पण, जाताना त्याने बसची बॅटरी मात्र काढून नेली. या बॅटरीची बाजारातील किंमत साधारण पाच हजार रुपये असल्याचे सांगितले जात आहे.

पीएमपीचे स्वारगेट डेपो सुरक्षा अधिकारी सुरेश सोनवने यांनी दिलेल्या तक्रारीवरुन अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. घटनेबाबत अधिक माहिती अशी की, पीएमपीएलच्या सर्व बस नियमानूसार आगारातून बाहेर काढल्या जातात आणि नियमानुसारच पुन्हा ठरलेल्या ठिकाणी आणून उभ्या केल्या जातात. त्यानुसार स्वारगेट आगारातील बस दिवसभर शहरात सेवा देतात आणि आपल्या फेऱ्या संपल्या की त्या पूलगेट येथील महात्मा गांधी बस आगारात उभ्या केल्या जातात. यातील काही बस स्वारगेट परिसरातही लावण्यात येतात. मात्र, पालखी सोहळ्यामूळे शहरात रहदारी वाढली होती. परिणामी पूलगेट आगारात बस लावण्यास जागा नव्हती. त्यामुळे चालकाने ही बस सारसबागेजवळ असलेल्या सणस मैदानाजवळ उभी केली. दरम्यान, गडबडीत तो बसची चावी काढण्यास विसरला. याचाच फायदा चोरट्याने घेतला. (हेही वाचा, ST Mahamandal: आता बस स्थानकांवर सुरु होणार मिनी थिएटर, एसटी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता देण्यासाठी शासन सकारात्मक; एसटीचा चेहरा मोहरा बदलण्याचा सरकारचा प्रयत्न)

चोरट्याने सणस मैदानाजवळून बस पळवली आणि ती मार्केट यार्ड परिसरात नेऊन उभी केली. जाताना त्याने बसची बॅटरी काढून नेली. चोरट्याने बसच्या काचाही फोडल्या आणि बसचे नुकसान केले. बस चोरीला गेल्याचे लक्षात आल्यावर प्रशासनाने 14 जून रोजी बसचा शोध घेतला असता ती मार्केट यार्ड आगाराजवळ लावल्याचे पाहायला मिळाले.