PMC बँक घोटाळाप्रकरणी संचालक सारंग आणि राकेश वाधवान अटक, 6500 कोटी रुपयांची फसवणूक केल्याची शक्यता

मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या (EOW) अधिकाऱ्यांनी HDIL चे प्रमोटर्स सारंग वाधवा (Sarang Wadhawan) आणि राकेश वाधवा (Rakesh Wadhawan) या दोघांना अटक करण्यात आली आहे.

PMC Bank branch in Mumbai | (Photo Credits: PTI)

पंजाब महाराष्ट्र कॉपरेटिव्ह बँक (PMC) घोटाळा प्रकरणी गुरुवारी दोघांना अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या (EOW) अधिकाऱ्यांनी HDIL चे प्रमोटर्स सारंग वाधवा (Sarang Wadhawan) आणि राकेश वाधवा (Rakesh Wadhawan) या दोघांना अटक करण्यात आली आहे. सुत्रांच्या मते सारंग आणि राकेश यांच्याकडून 3500 कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. एवढेच नाही तर पीएमसी घोटाळा प्रकरणी 6500 कोट्यावधींचा घपला केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

राकेश कुमार वाधवा कंपनीचे कार्यकारी अध्यक्ष असून सारंग प्रबंधकिय निर्देशक आहेत. सरकारकडून या दोघांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला होता. तसेच लुकआउट नोटिस जाहीर करुन या दोघांनी भारतात पळून जाऊ नये म्हणून सरकारडून हा निर्णय घेण्यात आला होता.(PMC Bank Crisis: कंपनीला दिलेल्या कर्जाची माहिती लपवण्यासाठी उघडली होती तब्बल 21 हजार खोटी खाती)

ANI Tweet:

पीएमसीकडून एचडीआयएलला कर्ज देण्यात आले होते, मात्र एचडीआयएलने कर्जाची रक्कम वेळेत न भरल्याने पीएमसी बँक आणि बँकेतील खातेदार आता अडचणीत आले आहेत.बँकेला 4355.43 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याबद्दल हा एफआयआर नोंदविण्यात आला आहे. अहवालानुसार पीएमसी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक (आता निलंबित) जॉय थॉमस, अध्यक्ष वरम सिंग आणि अन्य अधिकाऱ्यांची नावे एफआयआरमध्ये होती. त्यामधील सारंग आणि राकेश यांना गुरुवारी अटक करण्यात आली आहे.

तसेच पीएमसीच्या घोटाळ्यानंतर आरबीआयने या बँकेवर पुढील 6 महिन्यांसाठी आर्थिक निर्बंध लादले आहेत. त्यानुसार, बॅंकांना आता कर्ज देणे ठेवी स्वीकारणे यासह मोठ्या आर्थिक व्यवाहारांवर निर्बंध आले आहेत. तसेच आरबीआयने जाहीर केलेल्या परिपत्रकानुसार, आता खातेदार केवळ 10,000 रूपयांची रक्कम काढू शकणार आहेत.