PMC बँक खातेधारकांना आता 10 हजार ऐवजी 25 हजार रुपये काढता येणार, RBI कडून निर्णय जाहीर

त्यानुसार आरबीआयने पीएमसी बँक खाते धारकांना यापूर्वी प्रतिदिनी 10 हजार रुपये काढण्याची मुभा दिली होती.

PMC Bank (Photo Credits: IANS)

पंजाब आणि महाराष्ट्र कॉपरेटिव्ह बँक (PMC) घोटाळा प्रकरणी आरबीआय (RBI) कडून पुढील सहा महिन्यांसाठी आर्थिक निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यानुसार आरबीआयने पीएमसी बँक खाते धारकांना यापूर्वी प्रतिदिनी 10 हजार रुपये काढण्याची मुभा दिली होती. मात्र आज (3 ऑक्टोंबर) पुन्हा आरबीआयने ट्वीट करत बँक खाते धारकांना दिलासा देत 25 हजार रुपयांची रक्कम एकाच वेळी किंवा सहा महिन्यांसाठी काढण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.

Banking Regulation Act, 1949 च्या अंतर्गत आरबीआयकडून पीएमसी बँकेवर कारवाई करण्यात आली होती. यामुळे खातेधारकांची प्रचंड गर्दी बँकेचा बाहेर दिसून आली होती. तसेच पीएमसी बॅंक कर्मचार्‍यांनी HDIL ग्रुपच्या मालकाच्या घरासमोर बसून आंदोलन केले आहे. तसेच PMC बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक (MD) जॉय थॉमस यांनादेखील पदावरून हटवण्यात आलं आहे.(PMC बँक घोटाळाप्रकरणी संचालक सारंग आणि राकेश वाधवान अटक, 6500 कोटी रुपयांची फसवणूक केल्याची शक्यता)

RBI Tweet

पीएमसी बँक खाते धारकांना त्यांच्या खात्यामधून रक्कम काढण्यार निर्बंध घालण्यात आल्याने संपात व्यक्त करण्यात आला. तसेच पीएमसी बँकेत खातेधारकांचे कोट्यावधीचे फंड अडकून पडल्याने पुढील व्यवहार कसे पुर्ण होणार हा सुद्धा प्रश्न उपस्थित राहिला होता. मात्र आता आरबीआयने खातेधारकांना दिलासा दिला असून 25 हजार रुपये  काढता येणार असल्याचे सांगितले आहे.