PM Narendra Modi Visit To Dehu: पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 जून रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर, देहू येथे देणार भेट; मुंबई, पुणेसह राज्यभर अलर्ट
या दौऱ्यात ते पुणे जिल्ह्यातील देहू (PM Narendra Modi Visit To Dehu) येथे येणार आहेत. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. राजधानी मुंबई आणि पुणे शहरासह राज्यातही अलर्ट जारी करण्यात आला आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) उद्या (14 जून) महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते पुणे जिल्ह्यातील देहू (PM Narendra Modi Visit To Dehu) येथे येणार आहेत. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. राजधानी मुंबई आणि पुणे शहरासह राज्यातही अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यातील प्रमुख शहरांमध्ये रात्रीच्या वेळी नाकाबंदी करण्यात आली आहे. तसेच, मुंबई -पुण्यामध्ये बाहेरुन दाखल होणाऱ्या वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. देहू (Dehu) संस्थानाकडून मार्च महिन्यात मिळालेल्या निमंत्रणाचा स्वीकार करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. देहू येथे पंतप्रधान संत तुकारामांच्या मूर्ती आणि शिळा मंदिराचं लोकार्पण करतील.
इतिहासात देशाचे पंतप्रधान प्रथमच काही निमितताने देहू येथे येत आहेत. उल्लेखनीय असे की संत तुकारामांच्या मूर्ती आणि शिळा मंदिराचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत असले तरी, या मंदिराची पायाभारणी माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी केली होती. आता बांधकाम पूर्ण झाले असून मंदिर लोकार्पणासाठी खुले होत आहे. त्यासाठी 14 जून हा मुहूर्त काढला आहे. (हेही वाचा, PM Narendra Modi Dehu Visit: 14 जून रोजी पीएम नरेंद्र मोदी देहूच्या दौऱ्यावर; तुकाराम महाराजांची मूर्ती आणि शिळा मंदिराचे करणार लोकार्पण)
पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या लोकार्पण सोहळ्यासाठी येणार आहेत त्या शिळा मंदिराची पायाभारणी प्रतिभाताई पाटील यांनी राष्ट्रपती असताना केली होती. तेव्हापासून सुरु असलेल्या कामाला कोरोना काळात चांगली गती मिळाली. संपूर्ण दगडात तेही कोरीव काम करुन हे मंदिर उभारलेलं आहे जे आता पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पणासाठी प्रतीक्षेत आहे. हिच प्रतीक्षा आता 14 जून रोजी संपणार आहे.
दरम्यान, लोकार्पण कार्यक्रमापूर्व तीन दिवस आगोदर मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय संस्थानाने घेतला होता. या निर्णयामुळे मंदिर 12 जूनपर्यंत दर्शनासाठी बंद राहणार होते. मात्र, भाविकांनी सोशल मीडियावर जोरदार विरध दर्शवला त्यामुळे आता केवळ एकच दिवस म्हणजे 14 जून रोजी हे मंदिर दर्शनासाठी बंद राहणार आहे.