Pimpri Shocker: प्रेयसीला अपशब्द वापरल्याच्या रागातून वडिलांची हत्या, रचला आत्महत्येचा बनाव

या घटनेचा राग मनात धरून घरातील दोरीने अनिलने आपल्या वडिलांचा गळा आवळून हत्या केली.

प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Twitter)

आपल्या प्रेयसीविषयी वडिलांनी अपशब्द वापरल्याचा राग मनात ठेवत आपल्या वडिलांची गळा आवळून हत्या केल्याची घटना पिंपरीमध्ये घडली आहे. हत्यानंतर मुलाच्या आईने आणि मोठ्या भावाने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करत त्यांनी आत्महत्या भासवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी पाच तारखेला ही घटना घडली. हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव अशोक रामदास जाधव (वय 45) असे आहे. या प्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद करण्यात आल्यानंतर पोलिसांनी मुलगा राहुल अशोक जाधव (वय २५), अनिल अशोक जाधव (वय २३) यांना अटक केली आहे.  (Bacchu kadu: दोन वर्षांची शिक्षा आणि पाच हजारांचा दंड, शिक्षा झाल्यानंतर बच्चू कडूंची पहिली प्रतिक्रिया)

आरोपी अनिलच्या प्रेयसीविषयी मयत अशोक जाधव यांनी अपशब्द वापरत शिवी ही दिली होती. या घटनेचा राग मनात धरून घरातील दोरीने अनिलने आपल्या वडिलांचा गळा आवळून हत्या केली. अशोक यांच्या नाकातोंडातून फरशीवर पडलेले रक्त अनिलच्या आईने शर्टाने पुसत पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न देखील केला. तर आरोपी राहुल याने दोरीही घरच्या सिलींग फॅनला गुंडाळून अशोक यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली असे भासवण्याचा प्रयत्न केला. पंरतू पोलिसांनी हा सर्व बनाव असल्याचे ओळखून आरोपींना अटक केली आहे.