पिंपरी: आयटी कंपनीमधील तरुणाची स्वत:वर गोळ्या झाडत आत्महत्या, कारण अद्याप स्पष्ट न झाल्याने पोलिसांकडून तपास सुरु
पिंपरी (Pimpari) येथे रविवारी एका आयटी (IT) कंपनीत काम करणाऱ्य तरुणाने स्वत:वर गोळ्या झाडत आत्महत्या केल्याची घडना उघडकीस आली आहे.
पिंपरी (Pimpari) येथे रविवारी एका आयटी (IT) कंपनीत काम करणाऱ्य तरुणाने स्वत:वर गोळ्या झाडत आत्महत्या केल्याची घडना उघडकीस आली आहे. मात्र तरुणाने आत्महत्या का केली यामागील कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांकडून याचा तपास सुरु आहे. तसेच तरुणाकडे पिस्तुल कोठून आली याबद्दल सुद्धा तपास केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सचिन वांडेकर असे तरुणाचे नाव आहे. सचिन याने आत्महत्या करण्यापूर्वी तीन दिवस आधी नोकरी सोडली असल्याचे पोलिसांना सांगण्यात आले आहे. तसेच सचिनसह त्याचा भाऊ आणि एक मित्र राहत होता. परंतु नोकरी सोडल्यानंतर सचिन घराच्या बाहेरच गेला नसल्याचे त्या दोघांनी सांगितले आहे. रविवारी संध्याकाळच्या वेळेस सचिनचा भाऊ घराबाहेर पडताच पिस्तुलाच्या गोळीचा आवाज आल्याने धावत रुमजवळ आला. तेव्हा सचिनने स्वत:वर गोळ्या झाडल्या असल्याचा धक्कादायक प्रकार पाहिला.(नवी मुंबई: कामोठे परिसरात भरधाव वेगातील कारच्या धडकेत 2 जण ठार; 4 जणांची प्रकृती चिंताग्रस्त)
परंतु सचिनने गोळ्या झाडून घेतल्यानंतर तातडीने त्याला नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वी सचिन याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले आहे. तर पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास केला जात आहे.