पिंपरी-चिंचवड: लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या प्रियकराकडून प्रेयसीची गळा आवळून हत्या

ही घटना पुण्याच्या (Pune) पिंपरी चिंचवड (Pimpari Chinchwad) येथील रांजणगावात घडली आहे. प्रेयसीची हत्या केल्यानंतर प्रियकर स्वत:च पोलिसांच्या स्वाधिन झाला आहे.

Representational Image (Photo Credits: Facebook)

लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या एका प्रियकराने प्रेयसीची हत्या केल्याची धक्कदायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना पुण्याच्या (Pune) पिंपरी चिंचवड (Pimpari Chinchwad) येथील रांजणगावात घडली आहे. प्रेयसीची हत्या केल्यानंतर प्रियकर स्वत:च पोलिसांच्या स्वाधिन झाला आहे. त्यानंतर प्रियकराविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रेयसी गर्भवती झाल्याने दोघांमध्ये वाद सुरु झाला होता. याच वादातून तिची हत्या केली, अशी माहिती आरोपीने रांजणगाव एमआयडीसी पोलीसांना दिली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

किरण फुंदे आणि सोनामनी सोरेन हे दोघेही गेल्या काही दिवसांपासून रांजणगाव औद्योगिक वसाहत परिसरातील कारेगाव येथे संबंधित जोडपे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. दरम्यान, सोनामनी गर्भवती झाल्याने दोघांमध्ये वाद उद्भवला. गर्भ वाढवायचा नसल्याचे किरण याचे म्हणणे होते. यावरुन दोघांमध्ये वाद सुरु झाला. याच वादातून किरणने सोनामनीची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर किरणने घराला कुलूप लावून थेट रांजणगाव पोलीस ठाण्यात दाखल झाला, अशी माहिती टीव्ही9 मराठी आपल्या वृत्तात दिली आहे. हे देखील वाचा- मुंबई: रेमडेसिवीर औषधांचा काळाबाजार करणाऱ्या फार्मा कंपनीच्या दोन वरिष्ठ मॅनेजर्सला अटक

संपूर्ण महाराष्ट्र कोरोनाशी झुंज देत असताना वरील घटनेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊन घोषीत करण्यात आला होता. ज्यामुळे गुन्हेगारीच्या घटनेत काहीशी घट झाली होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून राज्यातील लॉकडाऊनच्या निर्बंधाना शिथिलता देण्यास सुरुवात झाली आहे. याचबरोबर गुन्हेगारीच्या बातम्या आपल्या कानावर पडू लागल्या आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif