Mumbai Local मध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र डब्ब्याची मागणी करणारी जनहित याचिका Bombay High Court मध्ये दाखल
जसा दिव्यांगांसाठी आहे.
मुंबई लोकल (Mumbai Local) मध्ये पिक अव्हर्स मध्ये प्रवास करायचा म्हणजे खचाखच गर्दीत आपली जागा आपल्यालाच बनवावी लागते. यामधूनच अनेकदा बसण्याच्या जागेवरून तुफान भांडणं, राडेबाजी झालेलं पहायला मिळालं आहे. मुंबईकर एका वकील प्रवाशाने मुंबई लोकल मध्ये सिनियर सिटीझन साठी वेगळा डब्बा असावा अशा मागणीसाठी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयामध्ये (Bombay High Court) केली आहे. TOI च्या वृत्तानुसार, जनहित याचिकेत 50 हजार वरिष्ठ नागरिक नियमित प्रवास करत असल्याचं म्हटलं आहे. K P Purushothamam Nair हे 66 वर्षीय असून स्वतः ज्येष्ठ नागरिक आहेत. ते स्वतः नियमित वांद्रे ते चर्चगेट प्रवास करतात त्यामध्ये त्यांना अनेक अडथळे येतात.
नायर यांच्या दाव्यानुसार, मुंबई लोकल मध्ये ज्येष्ठ नागरिकांना केवळ 14 जागा आहेत. त्या मिळवण्यासाठी झगडा करावा लागतो. त्या 14 जागा देखील suo motu PIL of 2009 नंतर मिळाल्या होत्या. गर्दीच्या वेळेस अनेकदा ज्येष्ठ नागरिकांच्या जागेवर तरूण मंडळी बसलेली असतात.
नायर यांनी आता मागणी केली आहे की रेल्वेमध्ये 65 वर्ष आणि वरील प्रवासांसाठी वेगळा डबा असावा. जसा दिव्यांगांसाठी आहे. नक्की वाचा: खचाखच भरलेल्या AC Local मध्ये चढण्याचा हट्ट करणार्या महिलेला Loco-Pilot ने दिली त्याच्या Compartment मधून प्रवासाची मुभा (Watch Video).
नायर म्हणाले की त्यांनी 2019 मध्ये तत्कालीन मुख्य न्यायमूर्तींना पत्र लिहिले होते जे रेल्वेच्या न्यायालयाच्या सार्वजनिक तक्रार कक्षाने पाठवले होते ज्याने जानेवारी 2020 मध्ये त्यांची याचिका फेटाळली होती. 2020 मध्ये मध्य रेल्वेच्या पत्रात म्हटले आहे की, "केवळ ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र बोग निश्चित करणे शक्य नाही," असे जनहित याचिकेमध्ये म्हटलं आहे.