Naughty Message On a LED: मुंबईतील वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे मेट्रो स्थानकाजवळ प्रवाशांचे एलईडी साइन बोर्डवर Naughty शब्दांत स्वागत, पहा व्हायरल व्हिडिओ

यापूर्वीही अशाच घटनांची नोंद झाली होती.

Naughty Message On a LED (PC - Twitter)

Naughty Message On a LED: सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ मुंबई शहरातील आहे. शहरातील वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे मेट्रो स्थानकाजवळून जाणार्‍या वाहनचालकांचे जवळच उभारलेल्या एलईडी साइन बोर्डवर 'Naughty' संदेश देऊन स्वागत करण्यात आले. हा साईन बोर्ड कोणी लावला होता, हे अद्याप समजू शकलेले नाही. वाहनचालकांनी या साईन बोर्डाचे फोटो आणि व्हिडिओ काढले असून शहराच्या नागरी संस्थेला टॅग करत ट्विटरवर शेअर केले आहेत. या LED साईनबोर्डवर लिहिलं आहे की, "Naughty America! Nobody! Nobody Does it Better! Oh yeee"

डिस्प्ले बोर्डवरील संदेश कोणी बदलला? हे अद्याप समजू शकलेले नसले तरी अशा स्वरुपाची घटना पहिल्यांदाच घडलेली नाही. यापूर्वीही अशाच घटनांची नोंद झाली होती. मार्चच्या सुरुवातीला नवी मुंबईत स्पीड-लिमिट साइन बोर्डवर एक धक्कादायक संदेश प्रदर्शित करण्यात आला होता. त्यानंतर अनेक वाहनधारकांनी चित्रीकरण करून पोलिसांच्या निदर्शनास आणून दिले होते. पोलिसांनी वेगमर्यादेच्या चिन्हाचा वीज पुरवठा खंडित केला होता आणि त्याची चौकशी केली होती. (हेही वाचा - Bombay High Court On Driving: वाहन वेगाने हाकणे म्हणजे निष्काळीजपाणा आणि गुन्हा नव्हे- मुंबई उच्च न्यायालय)

दरम्यान, जानेवारीमध्ये, हाजी अली-लोटस जंक्शनजवळ अशाच प्रकारची घटना नोंदवली गेली होती. ज्यामध्ये रहदारीची माहिती आणि संदेश प्रसारित करण्यासाठी एलईडी बोर्ड "ड्रिंक अँड ड्राईव्ह करू नका" आणि "धूम्रपान करू नका" असे संदेश रिले करू लागले.

एलईडी बोर्ड बसवणाऱ्या खासगी कंपनीच्या पर्यवेक्षकाने सांगितले की, कोणीतरी इलेक्ट्रॉनिक एलईडी बोर्ड सिस्टममध्ये तांत्रिक बदल करून संदेशांमध्ये फेरफार केला होता. नोव्हेंबरच्या सुरुवातीला, पवई परिसरात लावलेल्या "बघतोय काय लव**" अशा अपमानास्पद साइन बोर्डचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.