पनवेल मधील रेल्वेच्या वेटिंग रुममध्ये एका 25 वर्षीय महिलेने दिला नवजात मुलीला जन्म

महिलेला प्रवासादरम्यान लेबर पेन होऊ लागल्याचे तिने सांगितले. त्यानंतर एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे.

नवजात मुलीला जन्म (Photo Credits-ANI)

रेल्वे गाड्यांमधून प्रवास करतेवेळी आतापर्यंत बहुतांश महिलांनी नवजात बालकांना जन्म दिल्याच्या घटना समोर आल्या आहेत. याच दरम्यान आता पनवेल रेल्वे स्थानकातील वेटिंग रुममध्ये एका 25 वर्षीय महिलेने नवजात मुलीला जन्म दिला आहे. महिलेला प्रवासादरम्यान लेबर पेन होऊ लागल्याचे तिने सांगितले. त्यानंतर एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. सदर महिला आणि मुलगी सुखरुप असल्याची माहिती सेंन्ट्रल रेल्वेने दिली आहे.(दादर रेल्वे स्टेशनमध्ये महिलेची फलाटावरच प्रसूती)

महिला ही कोझिकोडे ते हजरत निजामुद्दीन असा प्रवास करत होती. परंतु प्रवासादरम्यान तिला लेबर पेन जाणवू लागल्याने तिला खाली उतरवण्यात आले. तर पनवेल रेल्वे स्थानकातील वेटिंग रुम मध्ये तिची प्रसुती करण्यात आली. महिलेने नवजात मुलीला जन्म दिल्यानंतर आनंद व्यक्त केला आहे.(Coronavirus In Maharashtra: 3 दिवसांच्या चिमुकल्यासह आईला चेंबूर येथील साई हॉस्पिटलमध्ये कोरोनाची बाधा)

यापूर्वी मुंबईच्या लोकलने प्रवास करणाऱ्या एका गर्भवती महिलेने बाळाला रेल्वेस्थानकात वैद्यकिय उपचारासाठी सुरु करण्यात आलेल्या वन रुपी क्लिनिक मध्ये जन्म दिला आहे. सदर महिला कर्जत ते परेल या मार्गाने प्रवास करत होती. मात्र अचानक प्रसुती कळा सुरु झाल्याने तिला स्थानकातील वन रुपी क्लिनिकमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.सदर महिलेने एका नवजात बालकाला जन्म दिला होता.