पनवेल येथे 18 वर्षीय तरुणाचा धबधब्यात पडून मृत्यू

पनवेल (Panvel) येथील धबधबा (Waterfall) अत्यंत धोकादायक असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले होते.

प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

पनवेल (Panvel) येथील धबधबा (Waterfall) अत्यंत धोकादायक असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले होते. तरीही करंजाडे येथे राहणाऱ्या मुलाने या धबधब्यात त्याचा आनंद घेण्यासाठी उतरला होता. मात्र दुर्दैवाने 18 वर्षाचा मुलगा पाण्याच्या प्रवाहामुळे अधिक असल्याने तो बुडाल्याची घटना घडली आहे.

राजेंद्र असे तरुणाचे नाव असून तो आपल्या मित्रांसोबत धबधब्याच्या ठिकाणी फिरण्यासाठी गेला होता. तर पाण्याच्या प्रवाहात राजेंद्रने त्याचा मृत्यू झाला. तर सायंकाळी उशिरापर्यंत त्याचा शोध सुरु होता तरीही तो सापडला नाही. शेवटी या घटनेची तक्रार मित्रांनी पोलिसांना कळवली.(वरंधा घाटातील रस्ता खचल्याने प्रवासासाठी धोकादायक, पर्यटकांना अतिदक्षतेचा इशारा)

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत रेस्क्यु ऑपरेशन सुरु केले. तर अथांग परिश्रम केल्यानंतर रात्री 12 वाजताच्या दरम्यान राजेंद्र याचा मृतदेह पोलिसांच्या हाती लागला. तसेच पोलिसांनी वारंवार सुचना देऊन ही असे प्रकार केले जात असल्याचे म्हटले आहे.