Pankaja Munde vs Suresh Dhas: भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; पंकजा मुंडे विरुद्ध सुरेश धस आमने-सामने, ऊसतोड मजुरांच्या मुद्द्यावरुन संघर्ष
सुरेश धस यांनी म्हटले आह की, केवळ आमचीच नव्हे तर महाराष्ट्र राज्य श्रमिक संघटना, गोपीनाथ मुंडे ऊसतोड संघटना यांसारख्या अनेक संघटनांनी ऊसतोड मजुरांच्या मजुरीमध्ये 150 टक्के वाढ, वाहतूकदरांची दरवाढ करुन ती दरवाढ 50 टक्के, मुकादमांचं कमिशन साडे 18 टक्क्कांवरुन 37 टक्के, करण्यात यावी अशी मागणी केली आहे.
उसतोड कामगारांच्या (Sugarcane Worker) मुद्द्यावरुन भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि आमदार सुरेश धस (Suresh Dhas) आमनेसामने आले आहेत. एकाच मुद्द्यावर दोन्ही नेत्यांनी वेगवेगळ्या भूमिका घेतल्याने बीड भाजपमधील (Beed BJP ) अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. उसतोड कामगारांना 21 रुपयांच्याही पुढे दरवाढ मिळायला हवी, अशी मागणी करतानाच कामगारांनी उसतोडीसाठी बाहेर पडण्याचे अवाहन पंकजा मुंडे यांनी केले आहे. दुसरीकडे भाजप आमदार सुरेश धस यांनी मात्र पंकजा मुंडे यांच्यापेक्षा वेगळी भूमीका घेत उसतोड कामगारांना दीडशे टक्के भाववाढ मिळावी अशी मागणी केली आहे. तसेच, जोपर्यंत दीडशे टक्के भाववाढ मिळत नाही, तोपर्यंत एकही उसतोड कामगार बाहेर पडणार नाही, असा इशाराही धस यांनी दिला आहे.
पंकजा मुंडे यांनी धस यांच्या इशाऱ्यावर भाष्य केले आहे. एका वृत्तवाहीनीला प्रतिक्रिया देताना पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे की, धस यांची ती व्यक्तीगत भूमिका आहे. त्यांनी केलेल्या मागणीसंदर्भात त्यांचे आणि माझे बोलणे झाले नाही. आमची मागणी उतसोड कामगारांना 21 रुपये भाववाढ मिळायला हवी अशी आहे. आता भाववाढीचा हा मुद्दा उसतोड लवादाच्या कोर्टात आहे. त्यामुळे त्यांचा निर्णय काय येतो ते पाहवे लागणार आहे, असे पंकजा मुंडे यांनी म्हटल आहे.
सुरेश धस यांनी म्हटले आह की, केवळ आमचीच नव्हे तर महाराष्ट्र राज्य श्रमिक संघटना, गोपीनाथ मुंडे ऊसतोड संघटना यांसारख्या अनेक संघटनांनी ऊसतोड मजुरांच्या मजुरीमध्ये 150 टक्के वाढ, वाहतूकदरांची दरवाढ करुन ती दरवाढ 50 टक्के, मुकादमांचं कमिशन साडे 18 टक्क्कांवरुन 37 टक्के, करण्यात यावी अशी मागणी केली आहे. (हेही वाचा, Shiv Sena Dussehra Rally 2020: मुख्यमंत्री पदाचा मास्क बाजूला करत उद्धव ठाकरे राजकारणावर काय बोलणार? भाषणाबाबत उत्सुकता; शिवसेना दसरा मेळावा इथे पाहा LIVE)
दरम्यान, पंकजा मुंडे यांनी ऊसतोड कामगारांना 21 रुपयांपेक्षा अधिक वाढ मिळाली तर कामावर जायला हकरत नाही, अशी भूमिका घेतली आहे. मात्र, बरोबर त्याच्या उलट भूमिका घेत भाजप आमदार सुरेश धस यांनी म्हटले आहे की, ऊसतोड कामगारांना जोपर्यंत 150% वाढ मिळ नाही तोपर्यंत ऊसतोड कामगारांच्या 11 संघटना आंदोलन करतच राहणार.