2021 ची जनगणना ही जातीनिहाय होणे आवश्यक असे ट्विट करत पंकजा मुंडे यांनी दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा जुना व्हिडिओ केला पोस्ट

पंकजा मुंडे यांनी "आम्हीही या देशाचे नागरिक आहोत, आमचीही गणना करा. ओबीसी जनगणनेची आवश्यकता आणि अपरिहार्यता आहे. कुछ यादे और कुछ वादे." असे आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

Pankaja Munde And Gopinath Munde (Photo Credits: Twitter/PTI)

एकीकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा जोरदार गाजत असताना दुसरीकडे भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी आपले दिवंगत वडिल तसेच ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांचा ओबीसी जनगणनेबाबतचा एक जुना व्हिडिओ शेअर करत जनगणनेचा मुद्दा उपस्थित केला आहे. पंकजा मुंडे यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर करत 2021 ची जनगणना ही जातीनिहाय करणे आवश्यक आहे अशी मागणी केली आहे. याबाबतचे दोन हिंदीमध्ये ट्विट करुन त्यांनी याबाबत माहिती दिली आहे.

पंकजा मुंडे यांनी "आम्हीही या देशाचे नागरिक आहोत, आमचीही गणना करा. ओबीसी जनगणनेची आवश्यकता आणि अपरिहार्यता आहे. कुछ यादे और कुछ वादे." असे आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

हेदेखील वाचा- Farmer Laws: कृषी कायद्याच्या विरोधात ऑल इंडिया किसान सभेच्या नेतृत्वात आंदोलक शेतकऱ्यांची नाशिक येथून मुंबईकडे कूच (Watch Video)

तसेच आपल्या दुस-या ट्विटमध्ये ""2021 ची जनगणना जातीनिहाय होणं आवश्यक आहे. गावागावातून उमटलेला आवाज हा राजधानीपर्यंत जरुर पोहचेल यात शंका नाही" असे सांगितले आहे.

त्याचबरोबर आपले पिता स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचा एक जुना व्हिडिओ त्यांनी शेअर केला आहे. ज्यात मुंडे "ओबीसींची आणि एसटी, एससी लोकसंख्येची जनगणना करावी. अन्यथा सरकारला या लोकांच्या रोषाला सामोरं जावं लागेल" असे सांगत आहे. संसदेत बोलतानाचा हा व्हिडिओ आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement