Pandharpur by-Election 2021: पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूक देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी महत्त्वाची, महाराष्ट्र भाजपवर होऊ शकतो दुरगामी परिणाम

तर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar), जयंत पाटील यांनीही या मतदारसंघातील मुक्काम अधिक वाढवल्याचे पाहायला मिळाले.

Devendra Fadnavis | (Photo Credits: Facebook)

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूक 2021 (Pandharpur-Mangalvedha by-Election 2021) मध्ये भाजप (BJP) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) अशा दोन्ही पक्षांनीक जोर लावल्याचे पाहायला मिळाले. पोटनिवडणूक असली तरीही या निवडणुकीला अत्यंत महत्त्व देण्यात आले. नव्हे नव्हे राष्ट्रवादी आणि भाजप या दोन्ही पक्षांकडून ह निवडणूक प्रतिष्ठेची करण्यात आली. भाजप आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आदी मंडळींकडून काहीशी अधिकच. या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि चंद्रकांत पाटील यांनी पंढरपूर, मंगळवेढा येथे तळ ठोकलेला दिसला. तर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar), जयंत पाटील यांनीही या मतदारसंघातील मुक्काम अधिक वाढवल्याचे पाहायला मिळाले. दोन्ही पक्षांनी लावलेला जोर पाहता ही निवडणूक नक्कीच किती महत्त्वाची आहे हे लक्षात येते. या निवडणुकीचे परीणाम दुरगामी असतील.

देवेंद्र फडणवीस यांची प्रतिष्ठा पणाला

राज्यातील महाविकासआघाडी सरकार किती भ्रष्ट आहे. कसे नाकर्ते आहे. जनतेला कसा त्रास होतो याचा पाढा देवेंद्र फडणवीस हे नेहमी वाचतात. राज्यातील महाविकासआघाडी सरकार सत्तेत आल्याच्या पहिल्या दिवसापासून देवेंद्र फडणवीस हे सरकार कसे नाकर्ते आहे हे सांगत आहेत. त्यात कोरोना व्हायरस महामारीच्या काळात तर ते एकही संधी सोडत नाहीत. त्यामुळे त्यांनी पंढरपूर मंगळवेडा विधानसभा पोटनिवडणूक प्रतिष्ठेची केल्याचे दिसते. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला यश आले नाही आणि भाजप उमेदवार विजयी झाला तर देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेत्यांचा आवाज आणखी तीव्र होणार आहे. सचिन वाझे प्रकरण, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात राज्य सरकार आगोदर बॅकफूटला गेले आहे. त्यामुळे या निवडणुकीत यश मिळाले तर भाजपला अधिक बळ मिळणार आहे. दुसऱ्या बाजूला फडणवीस यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. या निवडणुकीत यश मिळाले तर त्याचे पूर्ण श्रेय देवेंद्र फडणवीस यांना जाणार आहे. त्यामुळे भाजपमधील त्यांचे वजन अधिक वाढणार आहे. त्यामुळे त्यांच्याकडे असलेले भाजपचे नेतृत्व अधिक भक्कम होऊ शकते. (हेही वाचा, Kalyanrao Kale joins NCP: कल्याणराव काळे यांचा अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश)

राष्ट्रवादीकडून गड राखण्याचा प्रयत्न

महाविकासआघाडी सरकार सत्तेत आहे आणि मुख्यमंत्री पद हे शिवसेनेकडे आहे. महाविकासआघाडी सरकारमध्ये शिवसेना हा प्रमुख पक्ष आहे. राष्ट्रवादी काँग्रेस दुसऱ्या आणि काँग्रेस तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे. असे असले तरी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्यात फारसे अंतर नाही. दोन्ही पक्षांमध्ये केवळ एक-दोन जागांचा फरक आहे. भारत भालके यांच्या रुपात इथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार होता. अशा स्थितीत आपले स्थान मूळ जागा कायम ठेऊन कायम राखण्याचा राष्ट्रवदी काँग्रेस पक्षाचा प्रयत्न आहे. दुसऱ्या बाजूला या निवडणुकीत ज्या पक्षाचा उमेदवार निवडूण येईल त्या पक्षासोबत जणता असल्याचा संदेश जाणार आहे. कारण राज्यातील काळ सध्या तशा स्वरुपाचा आहे. त्यामुळे जतना आपल्या बाजूने आहे हे दाखवण्याची एकही संधी महाविकासआघाडी अथवा राष्ट्रवादी काँग्रेस सोडण्याची शक्यता नक्कीच नाही.

दूरगामी परीणाम

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा निवडणुकीचा राज्याच्या राजकारणावर दुरगामी परीणाम होऊ शकतो. राज्यातील जनतेचा सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांच्यापैकी कोणावर अधिक विश्वास आहे याची प्रचिती गेले प्रदीर्घ काळ आली नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होणाऱ्या निवडणुकांतून ती वेळोवेळी येत असते. कोरोना व्हायरस महामारीमुळे या निवडणुकाच म्हणाव्या तशा पार पडल्या नाहीत. मधल्या काळात ग्रामपंचायत निवडणुका झाल्या परंतू, त्या पक्ष चिन्हावर लढल्या जात नाहीत. त्यामुळे त्याचे यशापयश कोणाचे हे नेमके मोजता येत नाही. ही संधी या निवडणुकीच्या माध्यमातून आली आहे. कोरोना काळापूर्वी राज्यात पदविधर मतदारसंघात निवडणुका पार पडल्या. या निवडणुका महाविकासआघाडीने जिंकल्या. या पराभवाचा मोठा चटका भाजपला लागला. आता हे उट्टे या निवडणुकीत काढण्याचा प्रयत्न होऊ शकतो. त्यामुळे या निवडणुकीत आलेल्या यशापयशाचे दुरगामी परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणात होऊ शकतो. ही निवडणूक सत्ताधाऱ्यांनी जिंकल्यास जनता त्यांच्या बाजूने आहे असा संदेश जाईल. त्यातून महत्त्वाचे निर्णय घेताना राज्य सरकारचा आत्मविश्वास वाढेल. दुसऱ्या बाजूला इथे भारतीय जनता पक्षाने ही निवडणुक जिंकल्यास राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनवरच्या फेऱ्या वाढतील. सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्यासाठी भाजप अधिक आक्रमक होईल. तसेच, सत्ताधारी तुम्ही असलात तरी जनता आमच्या बाजूने आहे. राज्य सरकारविरोधात जनतेच्या मनात तीव्र विरोध आहे, असे भाजप क्षणोक्षणी सांगू लागेल.