PAN Card History कशी तपासाल? फसवणूक दूर ठेवण्यासाठी जाणून घ्या तपशील

अलिकडील काळात डिजिटल व्यवहारांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे काही सावधगिरी बाळगणे अतिशय महत्त्वाचे असते. त्यामुळे पॅन कार्डची हिस्ट्री (PAN Card History) सातत्यान चेक करणे अतिशय महत्त्वाचे ठरते.

PAN Card: | (Photo Credits: File Image)

परमनंट अकाऊंट नंबर (Permanent Account Number) म्हणजेच पॅन क्रमांक (PAN) हा भारतीय आयकर विभाग (Indian Income Tax Department) द्वारा देण्यात आलेला एक महत्त्वाचा आणि अतिशय उपयुक्त अशी ओळख असलेला क्रमांक. ज्यामुळे बँकेत खाते उघडणे, कर्ज मिळवणे यासोबतच संबंधित व्यक्तीच्या प्रत्येक आर्थिक हालचालिचा तपशील मिळवता येणे सहज शक्य होते. मात्र, अलिकडील काळात डिजिटल व्यवहारांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे काही सावधगिरी बाळगणे अतिशय महत्त्वाचे असते. त्यामुळे पॅन कार्डची हिस्ट्री (PAN Card History) सातत्यान चेक करणे अतिशय महत्त्वाचे ठरते.

डिजिडल व्यवहार आणि सायबर अभ्यासक सांगतात की, आजवर फसवणुकीच्या जितक्या तक्रारी आल्या आहेत. त्यात पॅन कार्डचा चुकीच्या पद्धतीने केलेल्या वापरामुळे अशा घटना घडण्याचे प्रमाण अधिक असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे अशा घटना टाळण्यासाठी, नागरिकांनी नियमितपणे त्यांच्या पॅन कार्डचा इतिहास तपासणे आवश्यक आहे. जेणेकरून ते योग्यरित्या वापरले जात आहे याची खात्री होते. हे आयकर विभागाच्या ऑनलाइन पोर्टलद्वारे किंवा विभागाशी थेट संपर्क साधून केले जाऊ शकते. (हेही वाचा, How to Change Name on Pan Card: पॅन कार्ड मध्ये नाव बदलायचे असेल वा दुरुस्त करायचे असेल तर 'या' पद्धतीने करा ऑनलाईन अर्ज)

पॅनकार्ड हिस्ट्री कशी तपासाल?

  • तुमच्या पॅन कार्डचा इतिहास तपासण्याचा एक मार्ग म्हणजे आयकर विभागाच्या ई-फायलिंग पोर्टला भेट देणे.
  • त्यसाठी तुम्हाला पोर्टलवर खाते तयार करावे लागेल आणि तुमचा पॅन कार्ड नंबर आणि इतर तपशील वापरून लॉग इन करावे लागेल.
  • एकदा लॉग इन केल्यानंतर, तुम्ही तुमच्या पॅन कार्डचे तपशील पाहू शकता. ज्यात तुम्ही केलेले केलेले कोणतेही व्यवहार किंवा बदल पाता येतील.
  • सातत्याने ही हिस्ट्री तपासणे तुम्हाला तुमच्या पॅन कार्डचा कोणताही अनधिकृत वापर ओळखण्यात आणि परिस्थिती सुधारण्यासाठी पावले उचलण्यात मदत करू शकते.

दरम्यान, तुम्ही ई-फायलिंग पोर्टलवर प्रवेश करू शकत नसल्यास किंवा एखाद्याशी थेट बोलण्यास प्राधान्य देत असल्यास, तुम्ही आयकर विभागाच्या ग्राहक सेवा केंद्राशी देखील संपर्क साधू शकता. कस्टमर केअर सेंटर तुम्हाला तुमच्या पॅन कार्डच्या इतिहासाची माहिती देऊ शकते. तुम्हाला येत असलेल्या कोणत्याही समस्यांचे निराकरण करण्यात मदत करू शकते.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now