मांडुळ सापांची तस्करी करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यासह अन्य एका आरोपीला पालघर येथून अटक
पालघर (Palghar) येथून मांडुळ दुर्मिळ अशा सापांची तस्करी करणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे
पालघर (Palghar) येथून मांडुळ दुर्मिळ अशा सापांची तस्करी करणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. या मांडुळांची किंमत जवळजवळ दीड लाख रुपये आहे. तर आरोपींमधील सुनील धानवा ह्याने शिवसेनेकडून 2009 मध्ये बोईसर विधानसभा निवडणुक लढवली होती. तर धनवा सध्या भाजप पक्षाचे कार्यकर्ते असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
मनोर पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील पाचोडे येथील एका घरात हे मांडुळ साप ठेवले असल्याची माहिती पोलिसांनी गुप्तहेरांकडून देण्यात आली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपींना अटक केली आहे. या दोन्ही आरोपींवर वन्यजीवन संरक्षण अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(हेही वाचा-तरुणीला डेट करण्याच्या वेडेपणामुळे 65 वर्षीय वृद्धाला तरुणीकडून 46 लाख रुपयांचा गंडा)
ANI ट्वीट:
तर धानवा यांच्यासह अटक करण्यात आलेल्या आरोपीविरुद्ध लवकरच कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. तसेच वाइल्ड लाइफ वॉर्डन यांच्या परवानगी शिवाय मांडुळ साप बाळगल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.