पालघरमध्ये 24 तासांत 337 नव्या कोरोना रुग्णांची भर; जिल्ह्यातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 11 हजार 740 वर पोहोचला

पालघर (Palghar) जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 337 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 11 हजार 740 वर पोहोचला आहे. आतापर्यंत पालघर जिल्ह्यातील 217 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

Coronavirus | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

राज्यात सर्वाधिक कोरोना रुग्णांची नोंद मुंबई शहर, ठाणे, पालघर, पुणे जिल्ह्यात होत आहे. पालघर (Palghar) जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 337 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 11 हजार 740 वर पोहोचला आहे. आतापर्यंत पालघर जिल्ह्यातील 217 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

राज्यात ग्रामीण भागांपेक्षा शहरी भागातील कोरोनाग्रस्तांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे ठाणे आणि मीरा भाईंदर महापालिका आयुक्तांनी 31 जुलैपर्यंत लॉकडाऊन कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. (हेही वाचा - Covid19 Cases In Mumbai: मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या वाढली; दिवसभरात 1 हजार 199 नव्या रुग्णांची नोंद, 65 जणांचा मृत्यू)

ठाणे जिल्ह्यात शनिवारी कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली. शनिवारी दिवसभरात 1 हजार 822 नव्या रुग्णांसह 43 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 65 हजार 927 इतकी झाली आहे.

याशिवाय मुंबई शनिवारी 1 हजार 199 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर, 65 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 178 वर पोहोचली आहे.