पालघर येथे 103 वर्षीय आजोबांची कोरोनावर मात, फुलांचा वर्षावर करत व्यक्त केला आनंद

त्यामुळे वारंवार नागरिकांना नियमांचे पालन करण्यास सांगितले जात आहे. काही ठिकाणी लॉकडाउनचे कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

Coronavirus | (Photo Credits: Pixabay)

राज्यात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा दिवसागणिक झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे वारंवार नागरिकांना नियमांचे पालन करण्यास सांगितले जात आहे. काही ठिकाणी लॉकडाउनचे कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. तर कोरोनाच्या रुग्णांचा आकडा कमी होण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. अशातच महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे पालघर मधील एका 103 वर्षीय आजोबांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. अतिसंवेदनशील वयोगटातील असताना देखील त्यांनी कोविड19 च्या विरोधात दिलेल्या लढ्यासाठी त्यांचे कौतुक केले जात आहे.

पालघर जिल्ह्यातील वीरेंद्र नगर येथे राहणारे शामराव इंगले यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या एका प्रवक्त्याने असे म्हटले की, कोरोनावर मात केल्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिला गेला. रुग्णालयातील डॉक्टरांच्या मते, वृद्धाला देण्यात आलेले उपचार यशस्वी ठरले. तर उपचारादरम्यान, त्यांनी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना सुद्धा पूर्णपणे सहाय्य केले. रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर आजोबांच्या चेहऱ्याव हास्य दिसून आले.(कोविड व्यवस्थापनाचं ‘मुंबई मॉडेल’ प्रेरणादायी; ट्विट करत नीती आयोगाचे अमिताभ कांत यांनी केलं BMC चं कौतुक)

जिल्हाधिकारी डॉ. मानिक गुरसाल यांच्यासह रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी आजोबांवर पुष्पवृष्टी करत त्यांना घरी पाठवण्यात आले. अधिकृत आकडेवारीनुसार, जिल्ह्यात कोविड19 चे 95,682 रुग्ण आहेत. तर 1715 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.(Coronavirus: नाशिक जिल्ह्यात कोरेाना नियंत्रणासाठी 12 ते 22 मे पर्यंत लॉकडाऊन)

दरम्यान, सध्या देशासह राज्यात कोरोनाच्या लसीचे डोस 18 वर्षावरील नागरिकांना सुद्धा दिले जात आहे. तर लस घेण्यासाठी रजिस्ट्रेशन केल्यानंतरच तुम्हाला लसीचा डोस दिला जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या घराजवळील लसीकरण केंद्रावर कोरोनाची लस घेऊ शकता. तसेच कोणत्याही केंद्रावर कोरोना लस घेण्यासाठी गेले तरी लसीकरण हे कोविन अॅप द्वारे नोंदणी केलेल्यांचेच होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आगोदर नोंदणी करावी आणि मग त्यानंतरच लस घेण्यासाठी केंद्रावर जावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.