Ratnagiri Nurse Rape Case: संतापजनक! नर्सिंगचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीवर बलात्कार, रत्नागिरी येथील रुग्णालयाचे कामकाज बंद

मुलींच्या आणि महिलेच्या सुरक्षतेचा प्रश्न हा गंभीर विषय बनला आहे. गेल्या आठवड्यातील बदलापूरच्या घटनेमुळे राज्यातलं वातावरण तापलेले असताना राज्यातील रत्नागिरी येथे संतापजनक घटना घडली आहे.

Ratnagiri Nurse Rape Case: Photo Credit X

Ratnagiri Nurse Rape Case: महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून महिलांच्या अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. मुलींच्या आणि महिलेच्या सुरक्षतेचा प्रश्न हा गंभीर विषय बनला आहे. गेल्या आठवड्यातील बदलापूरच्या घटनेमुळे राज्यातलं वातावरण तापलेले असताना राज्यातील रत्नागिरी येथे संतापजनक घटना घडली आहे. नर्सिंगचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार झाला. या घटनेनंतर नागरिकांनी निषेध व्यक्त करत रस्त्यावर उतरले आहे. (हेही वाचा- धक्कादायक! शाळेतील 15 दिवसांचे सीसीटीव्ही फुटेज गायब, दिपक केसरकर यांचा शाळेच्या मॅनेजमेंटवर कारवाईचा इशारा)

मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी येथील नर्सिंगचे शिक्षण घेणारी विद्यार्थी घरी जात होती त्यावेळीस तिच्यासोबत अत्याचार झाला. घरी जाण्यासाठी ती ऑटोरिक्षातून प्रवास करत होती. त्यावेळीस रिक्षाचालकाने तीला मादक पदार्थ असलेलं पाणी पिण्यास भाग पाडले. काहीच वेळाने तिला चक्कर आली. रिक्षा चालकाने रिक्षा एका निर्जन ठिकाणी नेली. विद्यार्थीनीवर बलात्कार केला. तरुणी बेशुध्द अवस्थेत एका ठिकाणी काही स्थानिकांनी दिसली. तोपर्यंत आरोपी घटनास्थळावरून फरार झाला.

स्थानिकांच्या मदतीने तरुणीला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. तीच्यावर बलात्कार झाल्याचे डॉक्टरांंनी अहवालात सांगितले. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तरुणीच्या कुटुंबियाना घटनेची माहिती दिली. संतप्त कुटुंबियानी आरोपीवर विरोधात तक्रार दाखल केली.

या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी आणि जिल्हा शासकीय रुग्णालयाचे कर्मचारी आक्रमक झाले. निषेध व्यक्त करण्यासाठी नागरिक रस्त्यावर उतरले आहे. या घटनेसंदर्भात पोलिसांना नागरिक जाब विचारत आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयातील कामकाज बंद केले.

या प्रकरणी पोलिसांनी सांगितले की, आरोपीला शोधण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. आरोपी अज्ञात असल्यामुळे शोधण्यासाठी वेळ लागणार आहे. आरोपीला शोधण्यासाठी पोलिसांनी पाच पथक नेमले आहे. या प्रकरणी कारवाई सुरु असल्याचे सांगितले.