Osmanabad Crime News: इयत्ता 7 वीत शिकणारी 14 वर्षीय मुलगी गर्भवती, लैंगिक अत्याचरप्रकरणी चौघांना अटक, शिराढोण पोलीसांची कारवाई
कळंब येथील शासकिय रुग्णालयात झालेल्या या तपासणीचा अहवाल आल्यानंतर चक्क डॉक्टरही हादरले. पीडिता दीड महिन्यांची गर्भवती असल्याचे अहवाल दर्शवत होता. या घटनेमुळे ऊसतोड आणि मोलमजूरी करुन उदरनिर्वाह करत असलेल्या या कुटंबाला मोठा धक्का बसला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात शिराढोन पोलीस स्टेशन (Shiradhon Police Station) दप्तरी गुन्हा दाखल झाला आहे.
उस्मानाबाद (Osmanabad) जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील एका गावात इयत्ता 7 वी मध्ये शिकणाऱ्या 14 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार (Sexually Assaulted) झाल्याने पीडिता गर्भवती राहिल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. पीडिता गर्भवती असल्याची पुसटशीही कल्पना तिच्या कुटुंबीयांना नव्हती. मात्र, पीडितेला कोरड्या ओकाऱ्यांचा त्रास सुरु झाला. पीडितेला अचानक कोरड्या ओकाऱ्या सुरु झाल्याने आणि त्या थांबत नसल्याने कुटुंबीयांनी तिची वैद्यकीय तपासणी केली. कळंब येथील शासकिय रुग्णालयात झालेल्या या तपासणीचा अहवाल आल्यानंतर चक्क डॉक्टरही हादरले. पीडिता दीड महिन्यांची गर्भवती असल्याचे अहवाल दर्शवत होता. या घटनेमुळे ऊसतोड आणि मोलमजूरी करुन उदरनिर्वाह करत असलेल्या या कुटंबाला मोठा धक्का बसला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात शिराढोन पोलीस स्टेशन (Shiradhon Police Station) दप्तरी गुन्हा दाखल झाला आहे.
वैद्यकीय अहवालानंतर पीडितेकडे केलेल्या चौकशीमध्ये धक्कादायक कृत्य पुढे आले. चौदा वर्षीय पीडितेने सांगितले की, आपण नेहमीप्रमाणे आजीचा डबा घेऊन शेताकडे दुपारी निघालो होतो. तेव्हा पाठिमागून आलेल्या एका 16 वर्षीय मुलाने तिला जबरदस्तीने ज्वारीच्या शेतात नेले आणि तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर पुढे काही दिवसांनी आपण घरात एकटे असताना एका 20 वर्षीय मुलाने आपल्यावर अत्याचर केला. हा प्रकार थांबतच नव्हता. नंतर आणखी एका 24 वर्षीय तरुणाने घरी काम आहे म्हणून पीडितेला आपल्या घरी नेले आणि तिथे तिच्यावर बलात्कार केला. पुन्हा आणखी एका 22 वर्षीय मुलाने पीडिता घरी एकटीच असल्याचे पाहून तिचा गैरफायदा घेतला आणि तिच्यावर बलात्कार केला. पीडितेने दिलेल्या माहितीनुसार 16 ते 24 या वयोगटातील चार आरोपींनी तिच्यावर वेगवेगळ्या वेळी आणि वेगवेगळ्या स्थळावर तिच्यावर बलात्कार केला. ज्यातून ती गर्भवती राहिली. (हेही वाचा, Rajasthan: सात वर्षाच्या मुलीची 38 वर्षांच्या व्यक्तीसोबत लग्नासाठी 4.5 लाख रुपयांन विक्री, राजस्थान राज्यातील घटना)
पीडितेने दिलेल्या अधिकच्या माहितीमध्ये म्हटले आहे की, आरोपींनी सलग सहा महिन्यांपासून पीडितेवर अत्याचार करणे सुरुच ठेवले होते. पीडिता कधीकधी आरोपींना विरोध करत असे. पण आरोपी तिला तिला आणि तिच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देत. पीडिता शेतात एकटी जात असल्याचे पाहून तिचा पाटलाग करत आणि तिच्यावर अत्याचार करत.
पीडित मुलीने दिलेली तक्रार आणि जबाब यावरुन शिराढोन पीलस स्टेशन (Shiradhon Police Station) दप्तरी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपींविरोधात कलम 376, (2)(I), 376, (2) (n), 376 ( 2) (j), 506, सह पोक्सो कलम 4, 8, 12 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात आतापर्यंत चार आरोपींना अटक झाली आहे. तर एक आरोपी अल्पवयीन असल्याने त्याची चकशी सुरु असल्याचे पीएसआय गंगाधर पुजरवाड यांनी म्हटले आहे.
(The above story first appeared on LatestLY on May 24, 2023 03:53 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

