Oshiwara Road Accident: मुंबईत मर्सिडीज कारच्या धडकेत 19वर्षीय फूड डिलेवरी बॉयचा मृत्यू; चालक अटकेत

मर्सिडीज कारच्या धडकेमध्ये एका डिलिव्हरी बॉयचा मृत्यू झाला आहे. अपघातानंतर त्या मुलाला नजीकच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे.

Road Accident | Photo Credits: ANI

मुंबई मध्ये ओशिवरा परिसरामध्ये एक दुर्देवी अपघात झाला आहे. मर्सिडीज कारच्या धडकेमध्ये एका डिलिव्हरी बॉयचा मृत्यू झाला आहे. अपघातानंतर त्या मुलाला नजीकच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. संबंधित घटनेनंतर पोलिसांनी कार ड्रायव्हरला अटक केली आहे. मुंबई: भरधाव होंडा सिटी कारच्या धडकेत 4 ठार, 4 जखमी; क्रॉफर्ड मार्केट येथील घटना.

 

दरम्यान मृत मुलाच्या कुटुंबियांकडून हा अपघात कार रेसिंगच्या प्रयत्नातून झाल्याचं म्हटलं आहे. मर्सिडीज कार मध्ये 3-4 लोक होते. तसेच मर्सिडीज कार ओव्हर स्पिडींग करत होती. यामध्येच कार चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि डिवायडर ओलांडून गाडी स्कुटर चालवणार्‍याला धडकली यामध्ये डिलिवरी बॉय असलेल्या मुलाचा नाहक जीव गेल्याचा कुटुंबीयांचा आरोप आहे. हा डिलिव्हरी बॉय अवघ्या 19 वर्षांचा होता. पुढल्या महिन्यातच त्याचा 20 वाढदिवस होता.

ANI Tweet

अपघातानंतर समोर आलेल्या दृश्यांमध्ये मर्सिडीज कारचा पुढचा भाग आपट्याचे तसेच स्कूटरचेदेखील नुकसान झाल्याचे पहायला मिळाले आहे. दोन्ही गाड्यांच्या पुढच्या भागांचा पार चक्काचूर झाला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement