कृषी संजीवनी सप्ताहानिमित्त महिला शेतकऱ्यांसाठी शनिवारी ऑनलाईन प्रशिक्षण; सेंद्रिय शेती, पूरक व्यवसायाची मिळणार माहिती: 'अशा' पद्धतीने होता येईल उमेद अभियानात सहभागी

या प्रशिक्षणामध्ये राज्यातील महिला शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती, पूरक व्यवसायाची माहिती देण्यात येणार आहे. राज्यातील महिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी ग्रामीण जीवनोन्नती अभियान तथा ‘उमेद’ अभियान पुढे आले आहे. ग्रामीण भागातील महिला शेतकऱ्यांना डिजिटल तंत्रज्ञानाशी जोडून त्यांची जीवनोन्नती साधण्याचा प्रयत्न या अभियानातून केला जाणार आहे.

Krishi Sanjeevani Week (PC - Twitter)

कृषी संजीवनी सप्ताहानिमित्त (Krishi Sanjeevani Week) महिला शेतकऱ्यांसाठी (Women Farmers) शनिवारी ऑनलाईन प्रशिक्षणाचे (Online Training) आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षणामध्ये राज्यातील महिला शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती, पूरक व्यवसायाची माहिती देण्यात येणार आहे. राज्यातील महिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी ग्रामीण जीवनोन्नती अभियान तथा ‘उमेद’ अभियान पुढे आले आहे. ग्रामीण भागातील महिला शेतकऱ्यांना डिजिटल तंत्रज्ञानाशी जोडून त्यांची जीवनोन्नती साधण्याचा प्रयत्न या अभियानातून केला जाणार आहे.

दरम्यान, यंदा राज्यातील महिला शेतकऱ्यांकरिता पहिल्यादांच ऑनलाईन प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. या प्रशिक्षणात सुमारे साडेचौदा लाख महिला शेतकरी सहभागी होऊ शकतील. यात खरीप हंगामातील सेंद्रीय शेती, एकत्रित शेती अशा विविध विषयांवर चर्चा केली जाणार आहे. शनिवारी 4 जुलै रोजी सकाळी 11 वाजता हा प्रशिक्षण कार्यक्रम सुरु होणार आहे. (हेही वाचा - मुंबईत येत्या 48 तासात मुळसधार पावसाचा अंदाज ; 3 जुलै 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE)

अशा प्रकारे होता येईल ऑनलाईन प्रशिक्षणामध्ये सहभागी -

राज्यातील सर्व महिलांना parthlive.com या संकेतस्थळावरुन तसेच उमेद अभियानाच्या mission umed या युट्यूब चॅनेलवरुन सहभागी होता येईल. या प्रशिक्षणात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, कृषीमंत्री दादाजी भुसे, ग्रामविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अरविंदकुमार, राज्याचे कृषी आयुक्त सुहास दिवसे मार्गदर्शन करणार आहेत.

उमेद अभियानाअंतर्गत घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रमामुळे महिला शेतकऱ्यांना शेतीतील अत्याधुनिक ज्ञान-तंत्रज्ञान, शेळीपालन, कुकुटपालन आदी शेतीपूरक व्यवसाय, सेंद्रीय शेतीचे महत्व, एकत्रित शेती अशा विविध विषयांची माहिती मिळणार आहे. उमेद अभियानामार्फत राज्यात महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी विविध कार्यक्रम राबविले जातात. त्याचाच एक भाग म्हणून महिलांना कृषी संजीवनी सप्ताहानिमित्त ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येणार आहे.