Online Fraud in Mumbai: दारुच्या नादात ऑनलाईन फसली, 30 रुपयांसाठी 4.8 लाख रुपये गमवून बसली; मुंबईतील घटना

घटना आहे मुंबई (Online Fraud in Mumbai) येथील.

Beer | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

ऑनलाईन दारु (Buy Beer Online) मागविण्याच्या नादात एक महिला सायबर (Cyber Crime) हल्लेखोरांच्या जाळ्यात अलगत फसली आणि केवळ 30 रुपयांसाठी 4.8 लाख रुपये गमवून बसली. घटना आहे मुंबई (Online Fraud in Mumbai) येथील. एका खासगी कंपनीमध्ये एक्झिक्युटिव्ह पदावर कार्यरत असलेल्या पवई येथील 32 महिलेने ऑनलाईन पद्धतीने दारु मागवली. तिला मालाची डिलिव्हरीही झाली. मात्र, सायबर हल्लेखोरांनी शोधलेल्या युक्तीमुळे तिची लाखो रुपयांची फसवणूक झाली.

पीडितेने ऑनलाईन मागवलेल्या दारुचे बील 620 रुपये झाले होते. जे तीने ऑनलाईन पद्धतीनेच दिले. मात्र, ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या सायबर हल्लेखोरांनी तिला फोन करुन सांगितले की, आपण 620 रुपयांऐवजी 650 रुपये बिल दिले आहे. म्हणजेच आपले 30 रुपये आमच्याकडे अधिक आले आहेत. तसेच, हे पैसे परत घेण्याचीही त्यांनी तिला विनंती केली. हे पैसे परत करण्यासाठी फसवणूक करणाऱ्या गुन्हेगारांनी तिला ऑनलाईन पद्धतीनेच पैसै परत घेण्याची विनंती केली. त्यासाठी तिला विशिष्ट Payment App वरुन कोड स्कॅन करण्यास सांगितले. काहीच वेळात तिला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. तिने थेट पोलिसांत जाऊन घडल्या प्रकाराची माहिती दिली. (हेही वाचा, आरोग्यासाठी दुधापेक्षा जास्त फायदेशीर आहे बिअर; PETA ने केला दावा, जाणून घ्या कारणे)

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना रात्री साधारण साडेआठ ते नऊ वाजणेच्या सुमारास घडली. पवई येथील एका आलिशान टॉवरमध्ये राहणाऱ्या पीडिता आणि तिच्या मेहुणीने रात्रीच्या वेळी मद्यसेवन करण्याचा बेत आखला. त्यासाठी त्यांनी परिसरातीलच एक बिअरबार शोधला. त्यांनी परिसरातील ओम साई बिअर दुकानाजवळ आल्या आणि त्यांनी एका नंबरवर संपर्क साधला. प्रदीप कुमार नावाच्या व्यक्तीने हा फोन घेतला. त्याने ऑर्डरनुसार पीडितेच्या मोबाइलवर एक QR कोड पाठवला आणि G Pay द्वारे 620 रुपये भरण्यासाठी तो स्कॅन करण्यास सांगितले.

दरम्यान, थोड्या वेळात प्रदीप कुमारने सांगितले की, तुमच्याकडून आम्हाला 30 रुपये अधिक आले आहेत. ते मला आपणास परत करायचे आहेत. फसवणुक करणाऱ्या व्यक्तीने पीडितेच्या मोबाइलवर पाठवलेला QR कोड स्कॅन करण्यास सांगितले. त्यानंतर पीडितेच्य खात्यातून R519,991 डेबिट झाले. मी याबद्दल चौकशी केली. माझ्या खात्यातून पैसे डेबिट झाले, फसवणूक करणार्‍याने काही त्रुटी असल्याचा दावा केला आणि पाठवलेला दुसरा OR कोड स्कॅन करण्यास सांगितले. यावेळी 96,108 रुपये डेबिट झाले. हे लक्षात येण्यापूर्वी मी अर्धा डझनपेक्षा जास्त वेळा QR कोड स्कॅन करण्याची फसवणूक करणार्‍याची विनंती पाळली. माझी 4.8 लाख रुपयांची फसवणूक झाली आहे.

पोलिसांनी या घटनेबद्दल अधिक माहिती देताना सांगितले की, आम्ही आरोपीचा माग काढण्यासाठी बँक खात्याचा तपशील मागवला आहे. ज्यात पैसे जमा झाले आहेत. आम्ही त्या व्यक्तीचे स्थान शोधण्यासाठी तपशील देखील गोळा करत आहोत." पवई पोलीस ठाण्यातील एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.