Palghar Horror: एकतर्फी प्रेमातून प्रियकराचा भरदिवसा 18 वर्षीय तरुणीवर विळ्याने हल्ला; पीडितेचा मृत्यू
अर्चनाच्या मैत्रिणींनी मदतीसाठी आरडाओरडा केल्याने आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. अर्चना ही मोखाड्यातील रयत शिक्षण संस्थेच्या महर्षी विठ्ठल रामाजी शिंदे प्राथमिक व माध्यमिक गभलपाडा आश्रमशाळेत शिकत होती.
Palghar Horror: पालघर (Palghar) जिल्ह्यातील मोखाडा (Mokhada) येथे एका 18 वर्षीय कनिष्ठ महाविद्यालयीन तरुणीवर 22 वर्षीय मुलाने एकतर्फी प्रेमातून विळ्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत मुलीचा जागीच मृत्यू झाला. आरोपी तरुणाचे पीडित अर्चना लक्ष्मण उदार हिच्यावर प्रेम होते. आरोपीच्या कुटुंबीयांनी अर्चनाच्या कुटुंबीयांकडे लग्नाचा प्रस्तावही आणला होता, जो मुलीच्या कुटुंबीयांनी नाकारला होता.
प्राप्त माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजता आरोपीने महाविद्यालयीन तरुणीच्या गळ्यावर विळाने वार केले. अर्चनाच्या मैत्रिणींनी मदतीसाठी आरडाओरडा केल्याने आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. अर्चना ही मोखाड्यातील रयत शिक्षण संस्थेच्या महर्षी विठ्ठल रामाजी शिंदे प्राथमिक व माध्यमिक गभलपाडा आश्रमशाळेत शिकत होती. (हेही वाचा - CRPF Jawan Killed In Hit And Run Incident: लातूरमध्ये हिट अँड रन घटनेत CRPF जवानाचा मृत्यू; अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल)
आश्रमशाळेची वर्गखोली मर्यादित असल्याने, कनिष्ठ महाविद्यालयाचे वर्ग आश्रम शाळेपासून 500 मीटर अंतरावर असलेल्या कर्मवीर भाऊराव पाटील वरिष्ठ महाविद्यालयाच्या इमारतीत चालवले जातात. विद्यार्थी एका शिक्षकासह महाविद्यालयात ये-जा करतात. आज विद्यार्थी आश्रमशाळेत जेवण करून परतत असताना सोबत शिक्षक उपस्थित नव्हते. याचाच फायदा घेत आरोपीने मुलीचा पाठलाग करून कब्रस्तान (कबरीस्तान) जवळील निर्जन भागात जाऊन तिच्यावर विळ्याने हल्ला केला.
अर्चनाच्या मैत्रिणींनी मदतीसाठी हाक मारली. अर्चनाला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तेथे पोहोचताच तिला मृत घोषित करण्यात आले. पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत. या घटनेने संपूर्ण पालघर जिल्ह्यात खळबळ उडाली असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.