Omicron Scare in Maharashtra: 55 वर्षांवरील पोलिस दलातील कर्मचार्यांना Work From Home चा पर्याय
त्यामुळे सध्या अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या 265 आहे.
महाराष्ट्रामध्ये वाढत्या कोरोनारूग्णांच्या पार्श्वभूमीवर आता प्रशासनाकडून कडक पावलं उचलण्यात आली आहेत. राज्यात निवासी डॉक्टरांपाठोपाठ आता पोलिस कर्मचारी (Police Employee) देखील कोरोनाच्या विळख्यात येत असल्याने सरकारने 55 वर्षांवरील पोलिस दलातील कर्मचार्यांना वर्क फ्रॉम होम (Work From Home) चा पर्याय दिला आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे (Dilip Walse Patil) पाटील यांनी मीडीयाशी बोलताना ही माहिती दिली आहे. राज्य सरकारच्या नव्या निर्णयामुळे आता पोलिस दलामध्ये कर्मचारी कमी असतील पण काम पहिल्या दोन लाटेदरम्यान जसे केले तसेच होईल असे त्यांनी सांगितले आहे. मुख्य सचिवांद्वारे कोविड मार्गदर्शक तत्त्वे जारी केली जातात आणि आपण स्वतःला कोविड 19 पासून सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांचे पालन केले पाहिजे असेही त्यांनी सांगितले आहे.
पोलिस खात्याकडून आज देण्यात आलेल्या माहितीनुसार, मुंबई मध्ये मागील 24 तासांत आज 71 पोलिस कर्मचार्यांचा कोविड 19 रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे सध्या अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या 265 आहे. हे देखील वाचा: Omicron Scare in Maharashtra: महाराष्ट्रात वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर लागू शकतो का पुन्हा लॉकडाऊन? यावर Maharashtra Health Department ने दिली महत्त्वाची माहिती.
ANI Tweet
महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक ओमिक्रॉनची लागण झालेले रूग्ण आहेत. त्या पार्श्वभूमीवर आता निर्बंध कडक करण्याला सुरूवात झाली आहे. काल महाराष्ट्रात 26,538 तर मुंबई मध्ये 15,166 नव्या कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे.