Man Abuse Minor Girl in Thane: अल्पवयीन मुलीला सार्वजनिक शौचालयात दाखवला अश्लिल व्हिडिओ, पोक्सो कायद्यांतर्गत आरोपीवर गुन्हा दाखल

त्यात आणखी एका धक्कादायक घटनेची भर पडली आहे. अंबरनाथ येथील सार्वजनिक शौचालयात नऊ वर्षाच्या मुलीला अश्लिल व्हिडिओ दाखवल्याची घटना समोर आली आहे.

Photo Credit- X

Man Abuse Minor Girl in Thane: राज्यभरात बदलापूर (Badlapur) येथील प्रकरणामुळे संताप व्यक्त केला जात आहे. त्यात आणखी एका धक्कादायक घटनेची भर पडली आहे. अंबरनाथ येथील सार्वजनिक शौचालयात नऊ वर्षाच्या मुलीला अश्लिल व्हिडिओ दाखवल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी ३५ वर्षीय व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (हेही वाचा-  जन्मदात्या पित्याने आईच्या मृत्यू पश्चात दीड वर्षाच्या मुलाला विकलं; मानवी तस्करी प्रकरणी गुन्हा दाखल)

मिळालेल्या माहितीनुसार, संतोष कांबळे असं आरोपीचे नाव आहे. तो पीडितेच्या परिसरातील रहिवासी आहे. आरोपी बहिणी आणि भावासोबत राहतो. या प्रकरणी पीडितेच्या आईने तक्रार केली. पीडितेच्या आईने पोलिसांना सांगितले की, पीडित मुलगी अंबरनाथ येथील शाळेत तिसरीत शिकत आहे. गेल्या १० वर्षापासून आरोपी शेजारीच राहतो. तो मजूरीचे काम करतो. आरोपीने मुलीला सार्वजनिक शौचालयात जाण्यास सांगितले होते. जिथे त्याने तिला अश्लिल व्हिडिओ दाखवला आणि त्याने पीडित मुलीसोबत अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न केला.

मुलीने नकार दिल्यानंतर तीला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानतंर घाबरून ती घरी परतली. मुलीने सर्व हकीकत तिच्या आईला सांगितली. त्यांनी २१ ऑगस्ट रोजी पोलिस ठाण्यात जाऊन आरोपी विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीवर पोक्सो कायद्यांतर्गत (POSCO) गुन्हा दाखल केला. आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif