Thane: बाई बिछान्यवरुन पडली, उचलण्यासाठी ठाणे महापालिका धावली
कुटुंबीयांनी तिला पुन्हा एकदा बेडवर ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात त्यांना यश आले नाही. अखेर त्यांना ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाशी संपर्क करावा लागला.
Thane Unusual News: ठाणे येतील 160 किलो वजनाची आजारी महिला बेडवरुन पडली. कुटुंबीयांनी तिला पुन्हा एकदा बेडवर ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात त्यांना यश आले नाही. अखेर त्यांना ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाशी संपर्क करावा लागला. अग्निशमन दालचे जवान तातडीने घटनास्थळी आले. त्यांनी ही महिला आणि तिच्या कुटुंबीयांना मदत केली. जेणेकरुन तिला पुन्हा बेडवर ठेवता आले. ठाणे महापालिका अग्निशमन दाल्याच्या अधिकाऱ्याने ही माहिती गुरुवारी (9 सप्टेंबर) दिली.
टीएमसीच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख यासिन तडवी यांच्या हवाल्याने 'इंडिया टुडे'ने दिलेल्या वृत्तानुसा, 62 वर्षीय पीडित महिला ही ठाणे जिल्ह्यातील वाघबीळ येथे राहते. पाठिमागील काही दिवसांपासून ती आजारी असते. त्यातच ती लठ्ठ असल्याने तिच्या हालचालींवर मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे ती शक्यतो बेडवरच असते. सकाळी 8 वाजणेच्या सुमारास चुकून ती खाली पडली. कुटुंबीयांनी तिला पुन्हा बेडवर ठेवण्याचा प्रयत्न केला. परंतू त्यात त्यांना यश आले नाही. अखेर त्यांनी ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती निवारण विभागाशी संपर्क साधला.
आपत्ती निवारण विभागाला फोन आल्यानंतर आमच्या विभागाचे स्थानिक अधिकारी जवानांसह महिलेच्या घरी गेले. त्यांनी त्या महिलेला अलगत उचलले आणि पुन्हा आपल्या मूळ जागी बेडवर ठेवले. जवानांना पोहोचेपर्यंत महिला आणि तिचे कुटुंबीयही घाबरले होते. मात्र, आमच्या जवानांनी तिला कोणत्याही प्रकारची दुखापत न होऊ देता तिला अलगत बिछान्यावर ठेवले. ज्यामुळे कुटुंबीयांसह त्या महिलेनेही सर्वांचे आभार मानले असे, यासीन तडवी यांनी सांगितले. या आधीही अग्निशमन विभागाने अशा अनेक कामगिऱ्या केल्या आहेत. आमच्यासाठी ही एक सामान्य बाब असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
अग्निशमन विभाग हा खऱ्या अर्थाने आपत्ती निवारण विभाग म्हणून काम करतो. उन, वारा, पाऊस, थंडी यांचा कोणताही विचार न करता या विभागाचे जवान लोकांच्या मदतीला धावत असतात. अनेकदा जेव्हा इमारतींना आग लागते तेव्हा या विभागाचे जवान मोठ्या धाडसाने आगीत घुसतात लोकांना वाचवतात. इतकेच नव्हे तर ती आग आटोक्यात आणण्याचे कामही ते करतात.