OBC Reservation: निवडणुका होणारच! आयोगाकडून सुधारीत तारखाही जाहीर; ओबीसी आरक्षण वाद वाढण्याची चिन्हे

इतकेच नव्हे तर ओबीसी आरक्षणाशिवाय 27% जागांच्या निवडणुकांसाठी ( Local Body Elections Dates ) सुधारीत तारखांची घोषणाही निवडणूक आयोगाने केली आहे. त्यामुळे आता या निवडणुका आयोगाने जाहीर केलेल्या सुधारीत तारखांनुसार पार पडणार आहेत.

Gram Panchayat Elections | (File Image)

ओबीसी आरक्षण (OBC Reservation) मुद्दा अद्यापही प्रलंबीतच आहे. त्यातच सर्वोच्च न्यायालयानेही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यास नकार दिल्याने राज्य सरकारची काहीशी कोंडी झाली. त्यामुळे राज्य सरकारने हा चेंडू निवडणूक आयोगाच्या कोर्टात ढकलला. दरम्यान, निवडणूक आयोगाने आपली भूमिका स्पष्ट करत निवडणुका घेण्यावर ठाम असल्याचे म्हटले आहे. इतकेच नव्हे तर ओबीसी आरक्षणाशिवाय 27% जागांच्या निवडणुकांसाठी (Local Body Elections Dates ) सुधारीत तारखांची घोषणाही निवडणूक आयोगाने केली आहे. त्यामुळे आता या निवडणुका आयोगाने जाहीर केलेल्या सुधारीत तारखांनुसार पार पडणार आहेत.

निवडणूक आयोगाने या आधी जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार 21 डिसेंबर रोजी मतदान पार पडणार होते. मात्र, दरम्यानच्या काळात सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आला. त्यामुळे या कार्यक्रमात काहीसा बदल करण्यात आला. नव्या बदलानुसार 73% जागांसाठी आधीच्या रचनेप्रमाणे मतदान 21 डिसेंबर रोजी पार पडेल. तर ज्या जागांवर ओबीसी आरक्षण लागू होते त्या ठिकाणी 27% जागा या अनारक्षीत म्हणून जाहीर करण्यात आल्या. त्यानुसार आता 18 जानवारी रोजी या जागांवर मतदान पार पडणार आहे. (हेही वाचा, OBC Reservation: महाविकास आघाडीला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; 21 डिसेंबरच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका ओबीसी आरक्षणाशिवाय)

निवडणुक आयोगाने स्पष केले आहे की, मतदानाच्या तारखा बदलण्यात आल्या आहेत. त्यामुळे मतदान वेगवेगळ्या तारखांना होणार आहे. मात्र, या सर्व जागांसाठी मतमोजणी एकाच वेळी 22 डिसेंबर रोजी होणार आहे. राज्याचे निवडणूक आयुक्त यू.पी.एस मदान यांनी ही माहिती दिली.