Nagpur: ब्राम्हणी गावात न्यूड डान्सचा धुमाकूळ, तिघांना अटक; SIT चौकशीचे आदेश
कार्यक्रमात मोठ्या संख्येने युवक सहभागी झाले होते. कार्यक्रमाचा आनंद घेतल्यानंतर आयोजकांनी तरुणांना 100 रुपये प्रतिव्यक्ती नग्न नृत्य पाहण्याचे आमिष दाखवले.
Nagpur: महाराष्ट्रातील एका गावात नग्न नृत्याचा कार्यक्रम आयोजित केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. हे प्रकरण नागपूरपासून 100 किमी अंतरावर असलेल्या उमरेड तालुक्यातील ब्राम्हणी गावातील आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केल्याचे सांगण्यात येत आहे. त्वरित कारवाई करत एसपी नागपूर यांनी एसआयटी चौकशीचे आदेश दिले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी एका न्यूड डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली होती. 17 जानेवारी रोजी ही घटना घडली होती, ज्यामध्ये लोकांना 100 रुपये देऊन व्हिडिओ पाहण्याचे आमिष दाखवले जात असल्याचा दावा केला जात आहे. याप्रकरणी तातडीने कारवाई करत एसपी नागपूर ग्रामीण विजय मगर यांनी तिघांना अटक केली आहे. यासोबतच एसआयटी तपासाचे आदेश दिले आहेत. ही घटना गावात घडल्याचं ग्रामस्थ आणि गावच्या सरपंचांनी फेटाळून लावल्याचं सांगण्यात येत आहे. नागपूर जिल्ह्याचे डेप्युटी एसपी संजय पुरंदरे म्हणाले, "पूजा गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील एसआयटी पथक या घटनेचा रविवारपासून तपास सुरू करेल." (वाचा - Nagpur Acid Attack: नागपुरात महिलेच्या चेहऱ्यावर फेकले अॅसिड, आरोपीला अटक)
काय आहे प्रकरण ?
17 जानेवारी रोजी ब्राह्मणी गावात गावकऱ्यांनी शंकरपट (बैलगाडी शर्यत) कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमात मोठ्या संख्येने युवक सहभागी झाले होते. कार्यक्रमाचा आनंद घेतल्यानंतर आयोजकांनी तरुणांना 100 रुपये प्रतिव्यक्ती नग्न नृत्य पाहण्याचे आमिष दाखवले. अहवालात असे म्हटले आहे की, व्हिडिओ उमरेड तालुक्यातील ब्राह्मणी गावातील आहे, परंतु गावचे सरपंच रितेश अंबोन यांनी दावा केला आहे की, हे प्रकरण त्यांच्या गावातील नाही. त्यांनी सांगितले, व्हायरल झालेला व्हिडिओ आमच्या गावचा नाही. 17 जानेवारीला आम्ही शंकरपटाचे आयोजन केले होते आणि त्यानंतर लावणीचा कार्यक्रम आयोजित केला होता, ज्यामध्ये कोणतीही नग्नता नव्हती.
मात्र, सरपंच खोटे बोलत असल्याचे डेप्युटी एसपी पुरंदरे यांनी सांगितले. आम्ही प्रकरणाचा तपास करत आहोत. स्थानिक पोलिस आणि शोचे आयोजक यांच्यात काही हातमिळवणी आहे का याचाही आम्ही तपास करण्यात येईल.