नागपुरात एका व्यक्तीने महिलेच्या चेहऱ्यावर अॅसिड फेकले. या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली असून महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आरोपी हा महिलेचा पती असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना सीसीटीव्हीतही कैद झाली आहे. प्लंबर असलेल्या सुरेशने शौचालयात वापरलेले अॅसिड पत्नीवर फेकले होते. या हल्ल्यात महिलेला गंभीर दुखापत झाली नसून तिच्यावर वैद्यकीय देखरेखीखाली उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
Tweet
पतीने पत्नीच्या चेहर्यावर फेकले ॲसिड, आरोपीला पोलिसांकडून अटक, महिलेवर उपचार सुरू#nagpurpolice #acidattack pic.twitter.com/OQwWskQcWd
— Timesnowmarathi (@timesnowmarathi) January 22, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)